आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलने पुर्ण केली चाहत्यांची इच्छा:चाहत्यांच्या मागणीनंतर कपिल शर्माने शेअर केला मुलांसोबतचा फोटो, म्हणाला - चाहत्यांच्या मागणीनंतर अनायरा-त्रिशानचा पहिल्यांदा एकत्र फोटो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिलने मुलांसोबत फादर्स डे साजरा केला.

विनोदवीर कपिल शर्माने रविवारी (20 जून) फादर्स डेनिमित्त चाहत्यांची खास मागणी पूर्ण केली आहे. चाहत्यांच्या मागणीवरुन कपिलने पहिल्यांदाच आपला मुलगा त्रिशानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कपिल शर्मा मुलगा त्रिशान आणि मुलगी अनायरा यांच्यासोबत दिसतोय. तिघांनीही व्हाईट टी-शर्ट परिधान केले असून ते फादर्स डे साजरा करताना दिसत आहेत.

अनायरा आणि त्रिशान पहिल्यांदा एकत्र
अनायरा आणि त्रिशानचा एकत्र असलेला फोटो कपिलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘चाहत्यांच्या मागणीनंतर अनायरा आणि त्रिशान यांचा पहिल्यांदा एकत्र फोटो. हॅपी फादर्स डे.’ कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ 1 फेब्रुवारी रोजी मुलगा त्रिशानचे आईवडील झाले.

कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ 1 फेब्रुवारी रोजी मुलगा त्रिशानचे आईवडील झाले. स्वत: कपिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. पण, कपिलने अद्याप मुलाचा फोटो शेअर केला नव्हता. आता कपिलने पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना त्रिशानची झलक दाखवली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
कपिल शर्माने त्रिशानचा फोटो शेअर केल्यापासून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वडील, मुलगा आणि मुलीचा हा गोंडस फोटो चाहत्यांना आणि सेलिब्रिटींनाही खूप आवडला आहे. कपिल शर्माने डिसेंबर 2018 मध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न केले होते. 2019 मध्ये गिन्नी-कपिल पहिल्यांदा मुलगी अनायराचे आईबाबा झाले होते.

बातम्या आणखी आहेत...