आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीने दिला मुलीला जन्म?:डिलिव्हरीच्या फेक न्यूजवर भारती म्हणाली - 'मी सध्या 'खतरा खतरा'च्या सेटवर असून काम करतेय'

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीची प्रसूती होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने मुलीला जन्म दिल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण आता स्वतः भारतीने या अफवांचे खंडन केले आहे. मी सध्या खतरा खतराच्या सेटवर असून काम करतेय, असे लाइव्ह येत भारतीने स्पष्ट केले आहे. लोक मेसेज करून अभिनंदन करत आहेत, पण ही बातमी खरी नाही, असे ती म्हणाली आहे. यापूर्वी भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी सांगितले होते की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसूती होण्याची शक्यता आहे.

लाइव्ह चॅटवर केले अफवांचे खंडन
सोशल मीडियावर लाइव्ह चॅट सेशनमध्ये भारती म्हणाली, "मला अभिनंदनाचे कॉल आणि मेसेजेस येत आहेत. मी मुलीला जन्म दिल्याची बातमी आहे, पण ती खरी नाही. मी 'खतरा खतरा'च्या सेटवर असून 15-20 मिनिटांचा ब्रेक होता म्हणून मी लाइव्ह येऊन सांगायचे ठरवले आहे. मी अजूनही काम करत आहे. मला भीती वाटते, माझी डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे.."

भारती पुढे म्हणाली, "हर्ष आणि मी त्या मुलाबद्दल बोलत होतो, तो आमच्यापैकी कोणावर जाणार, पण एक गोष्ट निश्चित आहे की बाळदेखील आमच्यासारखेच खूप फनी असेल. कारण आम्ही दोघेही फनी आहोत."

भारती कधीही आई होऊ शकते
भारती आठ महिन्यांची गर्भवती आहे आणि तिने गेल्या आठवड्यात तिचे यूट्यूब चॅनल LOL (लाइफ ऑफ लिंबाचिया) वर फोटोशूटचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीने सांगितले की, डॉक्टर म्हणतात की आता डिलिव्हरी कधीही होऊ शकते.

आम्ही आई होणार आहोत
भारतीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचे यूट्यूब चॅनल LOL (लाइफ ऑफ लिंबाचिया) वर 'आम्ही आई होणार आहोत' या शीर्षकाचा व्हिडिओ शेअर करत गुड न्यूड दिली होती. हर्ष आणि भारतीचे 3 डिसेंबर 2017 रोजी गोव्यात लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...