आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Comedy King Kapil Sharma Loose 11 Kg Weight For His Digital Debut, Archana Puran Singh And Govinda Made Fun Of His Transformatioon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द कपिल शर्मा शो:डिजिटल डेब्यूसाठी कॉमेडी किंग कपिल शर्माने कमी केले 11 किलो वजन, अर्चना पूरन सिंग आणि गोविंदाने घेतली फिरकी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिलला वेब शोसाठी 20 कोटी फीस मिळाली

टेलिव्हिजनचा लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' चा होस्ट कपिल शर्मा सध्या आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या कॉमेडी शो शिवाय कपिल लवकरच डिजिटल डेब्यू करणार असून याची तयारी त्याने सुरू केली आहे. वेब शोसाठी कपिल शर्माने 11 किलो वजन कमी करुन सर्वांना चकित केले आहे. कपिल शर्मा शोच्या सेटवर त्याने गोविंदासमोर याचा खुलासा केला, त्यानंतर संपूर्ण टीमने त्याची फिरकी घेतली.

अभिनेता गोविंदा मागील आठवड्यात कपिलच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. या शो दरम्यान त्यांनी आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील काही मजेदार किस्से सांगितले. अलीकडेच कपिल शर्मा शोच्या सेटचा एक व्हिडिओ गोविंदाच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ या शोच्या जज अर्चना पूरन सिंग यांनी तयार केला होता. या बिहाइंड द सीन व्हिडिओत गोविंदा टीमसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. याचवेळी कपिलने वेब शोसाठी 11 किलो वजन कमी केले असल्याचा खुलासा केला.

व्हिडिओमध्ये अर्चना पूरन सिंग यांनी कपिलला वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी विचारले असता त्याने उत्तर दिले की, "मी 92 किलोवरून 81 किलोवर आलो आहे. यासोबतच कपिलने आपल्या वेब शोविषयीदेखील सांगितले.

कपिलला वेब शोसाठी 20 कोटी फीस मिळाली
कपिल शर्माला त्याच्या डिजिटल डेब्यूसाठी 20 कोटी रुपये मिळाले आहेत, हे कृष्णा अभिषेकने अलीकडेच द कपिल शर्मा शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांना सांगितले होते. मात्र यासंदर्भात दुजोरा मिळालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...