आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरचे सोमवारी (7 डिसेंबर) निधन झाले. तिला न्यूमोनिया आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शिवाय तिचा कोविड 19चा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. दिव्याचा पती गगन गब्रू याच्यामुळे तिची ही अवस्था झाली असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबातील सदस्यांनी गगनविरोधात मुंबईतच एफआयआर नोंदवला असून आता ते त्याच्याविरोधात दिल्लीमध्येही तक्रार दाखल करतील.
दिव्याची चुलत बहीण मानसीने दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणात सांगितले की, "दीदी (दिव्या) ने एकदा जरी आम्हाला गगनबद्दल सांगितले असते तर ती आज आपल्यात असती. तिचा मृत्यू फक्त कोविडने झालेला नाही. गगन एक अतिशय वाईट व्यक्ती आहे. आणि त्याच्याविरूद्ध एक नव्हे तर अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही त्याच्याविरुध्द मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आमचे संपूर्ण कुटुंब दिल्ली येथे राहते, म्हणून आम्ही तिथेही तक्रार दाखल करू."
काहीही करुन आम्हाला गगनला तुरूंगात पाठवायचे आहे
मानसी पुढे म्हणाली, "त्याने माझ्या बहिणीवर खूप अत्याचार केले. दिव्याचा मित्र आणि मुंबईतील तिच्या शेजार्यांनीही त्यांचे जबाब पोलिसांना दिले आहे. आम्हाला काहीही करुन गगनला तुरूंगात पाठवायचे आहे. त्याने जे माझ्या बहिणीसोबत केले, ते भविष्यात इतर कोणत्याही मुलीबरोबर घडू नये अशी आमची इच्छा आहे. यापुढे कोणती कारवाई करावी याबद्दल कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र निर्णय घेतील. "
दिव्याचा भाऊ देबाशिषने गगनवर आरोप केले
यापूर्वी दिव्याचा भाऊ देबाशिषने गगनवर आरोप केले होते. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, 7 नोव्हेंबरला दिव्याच्या कपाटात त्याला दिव्याने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये गगनने कशाप्रकारे आपल्यावर अत्याचार केले, हे दिव्याने लिहिले होते. घरगुती हिंसाचाराच्या घटनेनंतर दिव्यानेही 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे गगनविरूद्ध एनसी दाखल करण्यासाठी संपर्क केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.