आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आइडल 12:शोच्या सेटवर स्पर्धक दानिश मोहम्मदने साजरी केली ईद, हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि अन्नू मलिक यांनी दिली ईदी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईदच्या खास निमित्ताने दानिशला सर्व परीक्षकांकडून ईदी मिळाली.

सांगितिक कार्यक्रम 'इंडियन आयडॉल 12' च्या सेट्सवर या वीकएंडच्या भागात लोकप्रिय गायक सुखविंदर सिंह उपस्थित असणार आहे. ते या कार्यक्रमात स्पर्धकांबरोबर काही अफलातून परफॉर्मन्सेस देताना दिसणार आहे. आदित्य नारायण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करेल तर हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि अन्नू मलिक परीक्षकांच्या भूमिकेत असतील. प्रेक्षकांसाठी हा संगीत, मनोरंजन आणि हास्यविनोदाने भरलेला भाग म्हणजे एक पर्वणीच असेल.

शोमधील स्पर्धक दानिश मोहम्मद हा सुखविंदर सिंह यांचा फार मोठा चाहता आहे. दानिश आणि सायली या भागात ‘बीडी जलई ले’ आणि ‘प्रेम जाल मेन फंस गई तू तो’ ही गाणी सादर करतील. याशिवाय दानिश 'दावत ए इश्क है' आणि 'इस शान ए करम' या गाण्यांवरही दमदार परफॉर्मन्स देणार आहे.

दानिशच्या सादरीकरणावर प्रतिक्रिया देताना मी जणू एखादा लाईव्ह कार्यक्रम पाहातोय, असे अन्नू मलिक म्हणाले. तर सुखविंदर म्हणाले, “ही तरुण आणि हुशार मुले फारच गुणी आहेत. इतक्या उच्च स्वरात गाणे हे विशेषच आहे.” दानिश ‘चल छैयां छैयां’ गाण्यावर सुखविंदर यांच्यासोबत परफॉर्म करताना दिसणार आहे.

दानिशने सेटवर साजरी केली ईद
आपल्या परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांना नेहमी मोहित करणारा दानिश या भागात फारच भावुक झालेला दिसेल. त्याने सुखविंदर यांच्याकडे स्वाक्षरीदेखील मागितली. दानिशने आपल्या टी-शर्टवर सुखविंदर यांचा ऑटोग्राफ घेतला. यावेळी दानिश सेटवर सर्व स्पर्धक आणि परीक्षकांसह ईद साजरी करताना दिसेल. त्याने यावेळी परिधान केलेला कुर्ता त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी पाठवला आहे. ईदच्या सेलिब्रेशनमध्ये दानिशचे आईवडीलदेखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी होतील. तिन्ही परीक्षक दानिशला ईदी देतानाही दिसतील.

बातम्या आणखी आहेत...