• Home
  • Entertainment
  • Tv
  • Coronavirus Effects: Ekta Kapoor Replaced Kumkum Bhagya And Kundali Bhagya From Kar Le Tu Bhi Mohabbat

कोरोनाव्हायरस / एकता कपूरच्या दोन टीव्ही मालिकांचे प्रसारण थांबले, राम-साक्षीच्या 'कर ले तू भी मोहब्बत'ने घेतली या दोघांची जागा 

  •  'कर ले तू भी मोहब्बत' राम कपूर आणि साक्षी तन्वर स्टारर वेब सीरिज आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 12:25:00 PM IST


टीव्ही डेस्क. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. सर्व प्रकारच्या शूटिंग आणि निर्मितीवर सध्या बंदी आहे. अशा परिस्थितीत एकता कपूरला तिच्या 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' या दोन लोकप्रिय शोचे प्रसारण नाईलाजाने थांबवावे लागले आहे. या दोन शोच्या जागी एकताने तिची वेब सीरिज 'कर ले तू भी मोहब्बत' टीव्हीवर आणली आहे.

  • बुधवारपासून 'कर ले तू भी मोहब्बत'

'कर ले तू भी मोहब्बत' ही वेबसीरिज बुधवारी रात्रीपासून छोट्या पडद्यावर सुरु झाली आहे. झीटीव्हीवर रात्री 9 ते 10 या वेळेत ही मालिका प्रसारित केली जात आहे. या टाइम स्लॉटमध्ये 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' या मालिका प्रसारित होत होत्या. महत्त्वाचे म्हणजे 'कर ले तू भी मोहब्बत' राम कपूर आणि साक्षी तन्वर स्टारर वेब सीरिज आहे, ज्याच्या पहिल्या सीजनचे स्ट्रिमिंग 2017 मध्ये एकताच्या डिजिटल प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीवर झाले होते. यानंतर 2018 आणि 2019 मध्ये आणखी दोन सीजनचे स्ट्रिमिंग झआले. तिन्ही सीजनचे मिळून एकुण 42 एपिसोड दाखवले गेले होते.

  • एकताने दु: खी मनाने केली होती घोषणा

एकता कपूरने बुधवारी दुःखी मनाने जाहीर केले होते की, ती आपल्या दोन लोकप्रिय मालिकांचे नवीन भाग शूट करू शकत नाहीये. एकताने 'कर ले तू भी मोहब्बत'चा प्रोमो शेअर करताना लिहिले की, "खूप अवघड वेळ. पण आम्ही एकमेकांसोबत आहोत. 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य'चे अधिक एपिसोड आम्ही बनवू शकत नाही. त्यामुळे आम्ही झीटीव्हीवरील आमचे कौटुंबिक कार्यक्रम एक्सटेंड केले आहेत. त्यामुळे रात्री 9 ते 10 या दरम्यान करण-प्रीता ('कुंडली भाग्य'मधील धीरज धुपर आणि श्रद्धा आर्य यांच्या व्यक्तिरेखा) आणि अभि-प्रज्ञा ('कुमकुम भाग्य'मधील शब्बीर अहलुवाल आणि श्रुती झा यांच्या व्यक्तिरेखा) ऐवजी टिप्सी आणि करण ('कर ले तू भी मोहब्बत'मधील साक्षी तन्वर आणि राम कपूर यांच्या व्यक्तिरेखा) तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. आम्ही आमच्या दर्शकांना मदत करण्यासाठी आणखी काहीही करू शकत नाही. पण या कठीण आणि तणावपूर्ण काळात त्यांचे मनोरंजन करू शकतो. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आमच्या लायब्ररीमधील ही एक भेट. आपली आवडती जोडी राम कपूर आणि साक्षी तन्वर टीव्हीवर परत येत आहेत. आनंद घ्या आणि घरी सुरक्षित रहा."

View this post on Instagram

Since we cannot make any more eps of #kumkumbhagya #kundalibhagya we have extended our family shows to @zeetv so 9 pm to 10 pm instead of karan preeta or abhi Pragya u will see tipsy n karan! we can’t do anything to help our viewers but entertain them during these tough stressed times so this gem from our library for u all! Ur fav couple #sakshitanwar n @iamramkapoor r back from tonight 9-10pm in#karletubhimohabat on tv! Enjoy n stay home n stay safe

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on Mar 24, 2020 at 9:23pm PDT

  • एकता टीव्हीवर आणखी एक वेब सीरिज घेऊन आली

'कर ले तू भी मोहब्बत'शिवाय एकता कपूरने टीव्हीवर 'कहने को हमसफर है' ही आणखी एक वेब सीरिज आणली आहे. बुधवारी रात्री 10.30 वाजतापासून त्याचे प्रसारण सुरू झाले आहे. रोनित रॉय, मोना सिंग आणि गुरदीप कोहली स्टारर या सीरिजचे स्ट्रिमिंग 2018 मध्ये झाले होते. आतापर्यंत याचे दोन सीजन दाखवले गेले आहेत.

View this post on Instagram

#kehnekohumsafarhain asks uncomfortable questions on morality n marriage! Now on @zeetv from tonight-10.30 pm! Wat if u find ur soulmate after u get married ( now pls stay safe n enjoy relax n wish d Ppl not well get well soon)

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on Mar 24, 2020 at 11:28pm PDT

X