आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध होस्ट आणि गायक आदित्य नारायणला मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता आदित्यची प्रकृती ठिक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देताना एका संभाषणात तो म्हणाला, "मला आता बरे वाटत आहे.. माझ्या पत्नीचीही प्रकृती ठिक आहे. मात्र या विषाणुने तिला थोडेसे कमजोर केले आहे."
आदित्य आता घरातच क्वारंटाइन आहे. कोरोनामुक्त झाला की नाही, हे तपासण्यासाठी आदित्य पुन्हा एकदा चाचणी करुण घेणार आहे. यासंदर्भात आदित्य सांगतो, "मला कोविडची लागण होऊन आता 18 दिवस झाले आहेत. त्यामुळे तीन आठवड्यांनंतर सोमवारी पुन्हा मी ही चाचणी करेन."
शोला मिस करतोय आदित्य नारायण
'इंडियन आयडल 12' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये होस्ट म्हणून परत येण्याची आदित्य तयारी करत आहे. स्पॉटबॉयशी बोलताना तो म्हणाला की, “मी याकाळात या कार्यक्रमाला खूपच मिस केले. आता शोमध्ये परतण्याची मी वाट बघतोय.” या संभाषणात आदित्यने आपल्या चाहत्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की सर्व खबरदारी घेऊन देखील तो आणि त्याची पत्नी कोरोनाच्या विळख्यात सापडले.
आदित्य म्हणाला, "घरी रहा. विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मी सर्व शक्य खबरदारी घेतली. मास्क घातला, सर्वकाही सॅनिटाइज केले. मी शूटिंग, जिम आणि पालकांना भेटण्याव्यतिरिक्त इतर कुठेही गेलो नाही. गर्दी टाळण्यासाठी माझ्या जिमची वेळदेखील मी संध्याकाळऐवजी सकाळी 6 ची केली होती. मात्र तरीही कोरोनाचा संसर्ग झाला."
आदित्यला गेल्या आठवड्यात झाला होता संसर्ग
इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायणने मागील शनिवारी सोशल मीडियावर त्याच्यासह त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. दुसर्याच दिवशी आदित्यचे वडील आणि दिग्गज पार्श्वगायक उदित नारायण यांनी दोघेही रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले होते.
आदित्यच्या अनुपस्थितीत ‘इंडियन आयडॉल’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी जय भानुशाली सांभाळत आहे. दरम्यान या शोचा स्पर्धक पवनदीप राजन यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये पवनदीपने स्वतःला क्वारंटाइन केले आहे. आगामी भागात पवनदीप व्हर्च्युअल परफॉर्म करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.