आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:वर्षभरापासून काम नव्हते, डिप्रेशनमध्ये येऊन 'क्राइम पेट्रोल'च्या अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांपासून तिला काम मिळत नसल्यामुळे प्रेक्षा मेहता नैराश्याचा सामना करत होती.

छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहताने इंदूरमधील बजरंग नगर येथील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री तिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्याने प्रेक्षा नैराश्यामध्ये गेल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर निराशाजनक पोस्ट लिहिली होती.सोमवारी रात्री ती आपल्या रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ तिचा फोन वापरत होती. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निराशाजनक एक स्टेटस पोस्ट केला. या पोस्टमध्ये तिने, ‘सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरुन जाणं’ असे लिहिले होते.

सकाळी जेव्हा तिचे वडील उठले तेव्हा त्यांनी प्रेक्षाने आत्महत्या केल्याचे पाहिले. ती तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या वडिलांनी आढळली. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रेक्षाला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रेक्षा गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत राहात होती.  

अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने मुंबई गाठली होती. क्राइम पेट्रोलसह काही शोज तिने केले होते.  पण लॉकडाऊन सुरु झाल्याने ती मुंबईहून इंदौरला तिच्या घरी परतली होती. सतत लॉकडाऊन वाढत असल्याने पुढचे अनेक दिवस काम मिळणार नाही, या विचाराने ती तणावग्रस्त झाली होती. 

View this post on Instagram

🌼

A post shared by Preksha Mehta 🎭 (@iamprekshamehta) on Jan 23, 2020 at 10:06am PST

अद्याप तिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. मात्र कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षा गेल्या काही दिवासांपासून तणावग्रस्त होती. आणि नैराश्यामध्येच तिने हे पाऊल उचलले असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी प्रेक्षाच्या अशा निघून जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...