आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री आत्महत्या प्रकरण:'क्राइम पेट्रोल' फेम प्रेक्षा मेहताची सुसाइड नोट व्हायरल, लिहिले - वर्षभर खूप प्रयत्न केले, पण आता मी थकलीय 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षा मेहताने सोमवारी रात्री इंदूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' या शोमध्ये झळकलेली अभिनेत्री प्रेक्षा मेहताना सोमवारी इंदूर येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक पत्र लिहिले होते. त्यातील काही भाग मीडियात व्हायरल होत आहे. त्यात तिने सांगितले, की भंगलेल्या स्वप्नांमुळे तिचा आत्मविश्वास ढासळला आहे.  वृत्तानुसार, सुसाईड नोटचा हा भाग इंदूर येथील हिरा नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव भदोरिया यांनी शेअर केला आहे.

  • 'मी मृत स्वप्नांसह जगू शकत नाही'

या सुसाइड नोटमध्ये 25 वर्षीय प्रेक्षाने लिहिले की, "माझ्या भंगलेल्या स्वप्नांमुळे माझा आत्मविश्वास ढासळला आहे. मी मृत स्वप्नांसह जगू शकत नाही. या नैराश्यासह जगणे कठीण आहे. मी वर्षभर बरेच प्रयत्न केलेत. पण मी आता थकलीय." प्रेक्षाने तिच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.

  • चुलतभावाने सांगितली आत्महत्येच्या आदल्या रात्रीची परिस्थिती

प्रेक्षाच्या चुलतभावाने या घटनेच्या आदल्या रात्रीची परिस्थिती सांगितली आहे. चुलत भावाने सांगितल्यानुसार, प्रेक्षा लहानपणापासूनच अतिशय चंचल स्वभावाची मुलगी होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती खूप शांत झाली होती. आत्महत्येच्या आदल्या रात्री संपूर्ण कुटुंब पत्ते खेळत होते. पण प्रेक्षा एकटीच पाय-यांवर शांत बसली होती. माझ्या काकूने (प्रेक्षाची आई) तिची चौकशीही केली. पण तिने ठीक आहे, असं म्हणून वेळ मारुन नेली होती."

  • प्रेक्षा रात्री 10 वाजता तिच्या खोलीत गेली

प्रेक्षाचा चुलतभाऊ पुढे म्हणाला, "रात्री दहाच्या सुमारास, प्रेक्षा टेरेसवरच्या तिच्या खोलीत गेली आणि आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट ('सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्नं मरुन जाणं') टाकली. दुसर्‍या दिवशी सकाळी काकूने तिला योगा करण्यासाठी उठविले, पण तिच्या खोलीचे दार आतून बंद होते. इतरांच्या मदतीने त्यांनी दार उघडले असता प्रेक्षा सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली."

  • एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत जाणारी कुटुंबीताली पहिली सदस्य

वृत्तानुसार एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत करिअर करणारी प्रेक्षा तिच्या कुटुंबातील पहिली सदस्य होती. तिचा चुलत भाऊ म्हणाला, "ती खूप मेहनती होती आणि तिने तिचे स्वप्न स्वतःच निवडले होते. त्यामुळे तिला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या." लॉकडाऊनमुळे प्रेक्षा मुंबईहून इंदूरला परतली होती आणि गेल्या वर्षभरापासून काम न मिळाल्यामुळे नैराश्यात होती, असे  सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...