आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावर पदार्पण:'जय हो' फेम डेजी शाह टीव्हीवर झळकणार, रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाह अखेरची सलमान खानच्या 'रेस 3' चित्रपटात दिसली होती. चित्रपटांमध्ये हात आजमावल्यानंतर ती आता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. डेजी लवकरच 'खतरों के खिलाडी 13' या रिअ‍ॅलिटी शोमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शोचे निर्माते आणि डेजी यांच्यात तीन आठवडे चर्चा झाली. अलीकडेच तिने या शोचा फायनल कॉन्ट्रॅक्ट साइन केला.

डेजी अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
डेजी अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

शोमध्ये देण्यात येणाऱ्या टास्कबाबत संभ्रमात होती डेजी
'खतरों के खिलाडी' या टीव्ही शोशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा शोच्या प्रोडक्शन टीमने पहिल्यांदा डेजीला या शोची ऑफर दिली, तेव्हा तिने यासाठी इंट्रेस्ट दाखवला, पण तिने पुष्टी दिली नाही. सुरुवातीला ती शोमधील टास्कबाबत संभ्रमात होती.'

टीमशी सल्लामसलत केल्यानंतर शोसाठी दिला होकार काही आठवडे तिच्या टीमशी सल्लामसलत केल्यानंतर तिने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला. एवढेच नाही तर तिने तिच्या फिटनेस ट्रेनिंगवर काम सुरू केले आहे आणि आता ती या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे.

सलमानच्या 'जय हो' या चित्रपटातून करिअरची केली सुरुवात
डेझीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 2014 मध्ये आलेल्या 'जय हो' या चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका साकारली होती. 'जय हो' नंतर डेजी शाहला अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ती 'हेट स्टोरी 3' आणि 'रेस 3' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली, पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नाहीत.

'जय हो' नंतर डेजी मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.
'जय हो' नंतर डेजी मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.

शोमध्ये डेजी शाह व्यतिरिक्त हे स्टार्स दिसणार
डेजी शाह व्यतिरिक्त शिव ठाकरे, अंजुम फारीख, अंजली आनंद, नायरा बॅनर्जी, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, अर्चना गौतम, साउंडूस (स्प्लिट्सविला विनर) हे सेलिब्रिटीदेखील स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. होस्ट रोहित शेट्टीसह संपूर्ण टीम पुढील आठवड्यात परदेशी शूटिंगसाठी रवाना होणार आहे.