आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Dance Deewane 4: Raghav Juyal Invites Controversoes For Make Fun Of The Contestants Of Assam In The Show, The Host Issued An Apology While Clarifying The Controversy.

डान्स दीवाने 4:शोमध्ये आसामाच्या स्पर्धकाची खिल्ली उडवणे राघव जुयालला पडले महागात, वाद वाढल्याने स्पष्टीकरण देत मागावी लागली माफी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेमके प्रकरण काय?

छोट्या पडद्यावरील डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डान्स दीवाने 4'चा होस्ट राघव जुयाल सध्या वादाच्या भोव-यात अडकला आहे. राघवने नॉर्थ-ईस्टची स्पर्धक गुंजन सिन्हा हिला स्टेजवर चिनी संबोधले होते, त्यानंतर त्याच्यावर वर्णद्वेषाचा आरोप करण्यात येतोय. आता वाद वाढल्यानंतर राघवने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

राघवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ जारी केला आणि लोकांचा गैरसमज दूर करत माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये राघव म्हणतोय, "हॅलो मित्रांनो, 'गेल्या काही दिवसांपासून एवढ्या मोठ्या शो मधील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप ही व्हायरल होत आहे. ज्याद्वारे मला वर्ण द्वेष करणारा असे म्हटले जात आहे. यावरुन माझ्यावर विविध आरोप प्रत्यारोपही केले जात आहे. मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यायचे आहे. यामागची संपूर्ण कथा मला तुम्हाला सांगायची आहे'

तो पुढे म्हणाला, 'गुंजन ही लहान मुलगी आसाममधील गुवाहाटीमधून आली होती. आम्ही अनेकदा स्पर्धकांना तुमचा छंद काय आहे, असे विचारतो. तर गुंजन म्हणाली होती की, मी चायनीज भाषेत बोलू शकते, हे ऐकून आम्ही हसून टाळ्या वाजवायचो. इथून तिची चायनीज भाषेत बोलण्याची प्रक्रिया सुरू झाली. आम्ही तिला प्रत्येक एपिसोडमध्ये चायनीज भाषेत बोलनू दाखव असे सांगायचो. अशाच प्रकारे या कार्यक्रमातील शेवटच्या काही भागात मी तिला तिच्या भाषेत बोलवले. कारण ती आधीच्या सर्व भाषेत ते बोलली होती. मी गंमत म्हणून तिला ते म्हणालो.'

मी ईशान्येशी खूप जोडलेला आहे: राघव

व्हिडिओमध्ये राघव पुढे म्हणाला, 'मी ईशान्येकडील लोकांशी खूप जोडलेले आहे. माझे कुटुंब अरुणाचल प्रदेशात राहते. माझे नागालँडमध्येही खास मित्र आहेत. मी ती व्यक्ती आहे जी प्रत्येक चुकीच्या गोष्टी सुधारत असते. कधी कधी कोणत्याही धर्म, संस्कृती आणि इतर गोष्टींबाबत भूमिका घेतल्याबद्दल मला शिवीगाळही केली जाते. माझ्या बोलण्याने तुमचे मन दुखावले गेले असेल तर मी खरंच क्षमा मागतो. यात माझा, कलर्स वाहिनीचा कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणतीही क्लिप व्हायरल करण्यापूर्वी त्या भागाच्या आधी काय झाले ते बघा आणि नंतर त्याबद्दल गैरसमज करुन घ्या.'

राघवने मूळ क्लिप दाखवली-

बातम्या आणखी आहेत...