आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी दोन मुलींचे आईबाबा झाले आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांच्या दुस-या लेकीचा जन्म झाला. पण वेळेआधीच ती जन्माला आली. स्वतः गुरमीतने पोस्ट शेअर करत बाळ प्रीमॅच्युअर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर देबिनानेही हॉस्पिटलमधला लेकीचा फोटो शेअर केला होता. बरेच दिवस चिमुकली रुग्णालयात दाखल होती. मात्र बरी होऊन ती घरीदेखील आली. पण रविवारी अचानक तिची प्रकृती बिघडली होती. नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये देबिना तिचे दु:ख शेअर करताना दिसतेय. धाकट्या लेकीची तब्येत ठिक नसल्याने ती टेन्शनमध्ये असल्याचे तिने सांगितले.
देबिनाने व्लॉगमध्ये सांगितले लेकीला नेमके काय झाले?
देबिना तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित व्लॉग शेअर करत असते. नुकत्यात शेअर केलेल्या व्लॉगमध्ये देबिना सांगते, मी व्लॉगमध्ये दाखवते त्या गोष्टी वाटतात तितक्या नेहमीच सोप्या नसतात. तुम्हाला माहीत आहे की, माझी धाकटी लेक वेळेच्या आधीच म्हणजे नऊ महिन्यांच्या आधीच जन्माला आलीय. त्यामुळे ती अशक्त आहे. रविवारी अचानक तिची तब्येत बिघडली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी आणि गुरमीत तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर समजले की, सर्दीमुळं तिचे नाक बंद झाले होते. त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. ऑक्सिजनची पातळीही 92 वर आली होती. घरातून हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत मी गुरमीतला फक्त एकच प्रश्न विचारत होते की, ती श्वास घेतेय ना? हे व्लॉगमध्ये सांगताना देबिना भावुक झाल्याचे दिसून आले. तिच्या डोळ्यात पाणी आले होते.
धाकट्या मुलीची तब्येत आता सुधारली आहे. मी आणि गुरमीत फक्त तिच्या तब्येतीकडं लक्ष देतोय, असे देबिनाने सांगितले. माझ्या धाकट्या मुलीसाठी प्रार्थना करा, असेही देबिनाने म्हटले आहे.
2011 मध्ये झाले होते दोघांचे लग्न
गुरमीत आणि देबिना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल आहे. दोघांची ओळख 2008 मध्ये 'रामायण' मालिकेच्या सेटवर झाली होती. यामध्ये त्यांनी राम सीतेची भूमिका साकारली होती. येथेच दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. नंतर त्यांनी 2011 मध्ये लग्न केले. लग्नाच्या दहा वर्षांनी म्हणजे याचवर्षी त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव लियाना असे आहे. आता ते दुस-यांदा आईबाबा झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.