आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 13:'कौन बनेगा करोडपती'मध्ये शानदार शुक्रवारच्या भागात येणार दीपिका पदुकोण आणि फराह खान, सोबतीला असतील 'इंडियन आयडॉल 12'चे सहा स्पर्धक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा खास भाग येत्या शुक्रवारी रात्री 9:00 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 13 मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि फराह खान या शुक्रवारी ‘शानदार शुक्रवार’च्या भागात हॉट सीटवर दिसणार आहेत. या दोघींच्या सोबतीला इंडियन आयडॉल 12 चे सहा स्पर्धक अर्थातच पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश, सायली कांबळे, निहाल तौरो आणि षण्मुखप्रिया कार्यक्रमाला चारचाँद लावतील.

दीपिका पदुकोण आणि फराह खान यांच्यात प्रेक्षकांना छान सख्य बघायला मिळेल. हॉटसीटवर बसून त्या दोघी एकामागून एक प्रश्नांची सफाईने उत्तरे देताना दिसतील. या भागात त्यांनी जिंकेलली रक्कम दीपिकाच्या ‘द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ला दान करण्यात येईल तसेच फराहकडून अयांश मदनच्या उपचारांसाठी रक्कम देण्यात येईल.

दीपिकाला तिच्या तक्रारी विचारून आणि रणवीरला फराह खानच्या ‘एक चुटकी सिंदूर’च्या ऑडिशनसाठी फोन कॉलवर बोलावून अमिताभ बच्चन आपली होस्टची भूमिका मस्त पार पाडली. कौन बनेगा करोडपतीचा ‘शानदार शुक्रवार’चा हा खास भाग येत्या शुक्रवारी रात्री 9:00 वाजता प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...