आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Despite Shooting In Chandigarh Shehna Gill Didmt Visit Her Family Angry Father Santosh Said I Swear I Will Not Talk To Her For Life

वडिलांची नाराजी:चंडीगडमध्ये शूटिंग करत असूनही कुटुंबाला भेटायला गेली नाही शहनाज गिल, नाराज झालेले वडील संतोष म्हणाले - तिच्याशी न बोलण्याची शपथ घेतो

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहनाजसोबत न बोलण्याची शपथ घेतो, असे तिच्या वडिलांनी संतप्त होऊन म्हटले आहे.

बिग बॉस 13 या शोमधून लोकप्रियता मिळवणारी शहनाज गिल लवकरच सिद्धार्थ शुक्लासह एका म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण चंदीगडमध्ये पूर्ण झाले असून त्यानंतर सिद्धार्थ आणि शहनाज मुंबईत परतले आहेत. विशेष म्हणजे शहनाजचे कुटुंबीय चंदीगडमध्येच वास्तव्याला आहेत. असे असूनदेखील शहनाज आपल्या कुटुंबीयांना भेटायला घरी गेली नाही. त्यामुळे तिचे वडील संतोष सिंग खूप दुखावले गेले आहेत. शहनाजसोबत न बोलण्याची शपथ घेतो, असे त्यांनी संतप्त होऊन म्हटले आहे.

एकाच शहरात असूनदेखील कुटुंबीयांना न भेटल्याबद्दल तिच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी टेलिचक्करसोबत बोलताना म्हटले, "शहनाज चंदीगडमध्ये शूटिंग करत होती आणि ती कुटुंबाला भेटायला देखील आली नाही. तिचे घर शूटिंग लोकेशनपासून अवघ्या दोन तासाच्या अंतरावर होते. शहनाज इथे येत असल्याची बातमी आम्हाला कळली. शूटिंग किंवा चंदीगडमध्ये येण्याबद्दल तिने आम्हाला काही सांगितले नाही. तिच्या आजोबांची काही दिवसांपूर्वी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, परंतु असे असूनदेखील शहनाजने त्यांना भेटायला आली नाही.'

माझ्याकडे तिच्या मॅनेजरचा नंबरही नाही: संतोष
संतोष सिंग पुढे म्हणाले, 'आता तिच्याशी कधी भेट होईल माहित नाही. ती शूटिंगसाठी येथे नेहमी येत असते, पण आम्हाला भेटत नाही. माझ्याजवळ तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या मॅनेजरचा नंबरदेखील नाही. तिच्याशी कधीही न बोलण्याची मी आता शपथ घेतली आहे', असे ते म्हणाले.

चाहत्यांसह फोटो काढण्यास दिला होता नकार
शहनाज गिल एक पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहे. बिग बॉस 13 मुळे ती घराघरांत पोहोचली आणि तिचा चांगले प्रोजेक्ट्स मिळू लागले. तिचे वडील संतोष सांगतात की, काही जवळचे मित्र आणि नातेवाईक तिच्यासोबत फोटो काढू इच्छित होते, परंतु शहनाजने यास नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...