आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पुण्यतिथीला देवोलीनाने काढली सिद्धार्थची आठवण:म्हणाली - सिड आपल्यासोबत नाही हा विचार करुनच खूप त्रास होतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याची आज पहिली पुण्यतिथी आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ कायमचे हे जग सोडून गेला. सिद्धार्थच्या पुण्यतिथीला त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने सिद्धार्थची आठवण काढली आणि सांगितले की, सिद्धार्थ आपल्यात नाही, हा विचार करुनच मन खिन्न होते.

शोमध्ये आमच्यात सतत भांडणे झाली, पण आम्ही नेहमीच चांगले मित्र होतो
देवोलीना म्हणते, 'तो एक जेंटलमन होता. शोमध्ये आमच्यात भांडणे झाली, पण आम्ही मित्रच राहिलो. शोच्या बाहेर आम्ही खूप चांगले मित्र होतो. तो माझी चेष्टा कसा करायचा, माझ्याशी फ्लर्ट करायचा आणि घरी माझ्यासाठी गाणी गायचा, हे विचार करून मी कधी कधी हसते. शोमध्ये मला दुखापत झाली तेव्हा त्याने माझी काळजी घेतली होती.'

बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ-देवोलिना एकत्र दिसले होते.
बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ-देवोलिना एकत्र दिसले होते.

सिद्धार्थसारखे यश सगळ्यांनाच मिळत नाही
सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याचा वारसा अजूनही जिवंत ठेवला आहे, ज्याबद्दल देवोलिना म्हणते, 'मला वाटते हेच खरे यश आहे. प्रत्येकाला असे यश मिळत नाही. मला आशा आहे की सिद्धार्थ जिथे असेल तिथे तो शांततेत असेल. मला सिडची खूप आठवण येते,' असे ती म्हणाली.

हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता सिद्धार्थचा मृत्यू
बिग बॉस सीझन-13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गेल्या वर्षी (2 सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच त्याची प्रकृती खालावत गेली होती.

बातम्या आणखी आहेत...