आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवोलिना भट्टाचार्जी थाटतेय लग्न!:ब्रायडल लूकमधील फोटो केले शेअर, युजर्स म्हणाले- पब्लिसिटी स्टंट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी विवाहबंधनात अडकणार आहे. देवोलीनाने मंगळवारी रात्री तिच्या हळदी समारंभाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. यादरम्यान 'साथ निभाना साथिया'मधला तिचा को-स्टार विशाल सिंगही उपस्थित होता. विशाल आणि देवोलिना लग्न करत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आता देवोलीनाने तिचा ब्राइडल लूकदेखील चाहत्यांना दाखवला आहे.

देवोलीना नववधूच्या रुपात दिसली

या फोटोंमध्ये देवोलिना नववधूच्या रुपात दिसत आहे. तिच्या हातात कलीरेही दिसत आहेत. यासोबत देवोलीनाने तिच्या हातावर लावलेली मेंदीही चाहत्यांना दाखवली आहे. आता हे फोटो पाहिल्यानंतर देवोलिना तिचा कथित बॉयफ्रेंड विशाल सिंगसोबत लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नेटक-यांना वाटतोय पब्लिसिटी स्टंट
दुसरीकडे, देवोलीनाचा ब्राइडल लूक पाहून काही लोक हैराण झाले आहेत. अभिनेत्री प्रसिद्धीसाठी हे सगळे करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एका नेटकऱ्याने फोटोवर कमेंट करत लिहिले की, 'तुम्ही असे प्रँक का करता?' तर आणखी एकाने लिहिले, 'मला आशा आहे की हे लग्न खरे असेल.'

देवोलीनाने याआधीही चाहत्यांसोबत केला होता प्रँक

देवोलीनाने याआधी विशाल सिंगसोबतचा साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून दोघांचा साखरपुडा झाला, असे चाहत्यांना वाटले होते. हा व्हिडिओ शेअर करत देवोलीनाने लिहिले होते, 'इट्स ऑफिशिअल.' मात्र, काही दिवसांनंतर दोघांनी त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओसाठी हे प्रँक केल्याचे समोर आले होते.

बातम्या आणखी आहेत...