आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'साथ निभाना साथिया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने लग्नगाठ बांधली आहे. शहनवाज शेख असे तिच्या नव-याचे नाव असून लोणावळ्यात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले. तिच्या मेंदी, संगीत आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला समोर आलेल्या फोटोंमधून देवोलीना तिचा को-स्टार विशाल सिंगसोबत लग्न करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता स्वतः देवोलीनाने लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या नव-याची सगळ्यांना ओळख करुन दिली आहे.
लग्नानंतर देवोलीनाने एक पोस्ट शेअर केली आहे. यासह तिने पतीसोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. "हो मी अभिमानाने सांगू शकते की अखेर मी हे केलं. हो मी आणि शोनू. मी दिवा घेऊनही शोधायला निघाले असते, तरी तुझ्यासारखा दुसरा कोणी मला मिळाला नसता. तू माझ्या वेदना आणि प्रार्थनांचे उत्तर आहेस. आय लव्ह यू शोनू. माझ्या आयुष्यातील रहस्यमयी व्यक्ती आणि तुमचा सर्वांचा जीजू #SHONU तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी असू द्या," असे कॅप्शन देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टला दिले आहे.
कोण आहे शहनवाज?
शहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. देवोलीना आणि शहनाज मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले आहे. दोघांची भेट जिममध्ये झाली. ही जिम तिच्या घराच्या जवळच आहे. साथिया मालिकेच्या सेटवर देवोलिनाचा अपघात झाला होता. त्यावेळी शहनवाजने तिला आधार दिला होता.
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी विवाहबंधनात अडकणार आहे. देवोलीनाने मंगळवारी रात्री तिच्या हळदी समारंभाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. यादरम्यान 'साथ निभाना साथिया'मधला तिचा को-स्टार विशाल सिंगही उपस्थित होता. विशाल आणि देवोलिना लग्न करत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आता देवोलीनाने तिचा ब्राइडल लूकदेखील चाहत्यांना दाखवला आहे. बघा देवोलीनाने शेअर केलेले फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.