आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस विजेती आणि टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. विशेष म्हणजे तिचे युट्यूब चॅनेलही आहे. या युट्यूब चॅनलवर दीपिका आणि तिचा पती शोएब त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी खास अंदाजात दीपिकाने तिची प्रेग्नेंसी जाहीर केली होती. लग्नानंतर जवळजवळ पाच वर्षांनी दीपिका आणि शोएब आई-बाबा होणार आहेत. पण अनेक जण या दोघांना ट्रोल करताना दिसत आहेत.
काही जणांनी दीपिका गरोदरपणाचे नाटक करत असल्याचे म्हटले. दीपिका गरोदर वाटत नाहीये. तिचं पोटंही दिसत नाही. असे अनेक जणांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. यावर दीपिका प्रचंड भडकली असून तिने या ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेतली आहे.
नेमके काय झाले?
दीपिका आणि शोएबने काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या पाचव्या अॅनिव्हर्सरीला दीपिकाने शोएबसाठी खास सरप्राइज प्लॅन केलं होतं. पण शोएबनं मात्र तिच्यासाठी काहीच केलं नाही. नेमका हा मुद्दा घेऊन नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केले आहे. इतकंच नाही तर दोघांच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हेच दीपिकाच्या जिव्हारी लागले आणि तिने एक व्लॉग शेअर करत अशा कमेंट्स करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाली दीपिका?
दीपिकानं यात शोएबची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. दीपिका म्हणाली की, 'शोएब एक टीव्ही अभिनेता आहे, त्याचा सगळ्यात जास्त वेळ सेटवर जातो. ज्या लोकांना खरे काय माहीत ते लोकही नकारात्मक कमेंट करतात. खरं काय ते जाणून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. इतकंच नाही तर काहींनी माझ्या भूतकाळाबद्दलही भाष्य केले आहे. पण त्यांना काय माहीत की, मी भूतकाळात काय काय सोसले आहे.'
पुढे ती म्हणाली, 'तुम्ही लोकांनी तर मी नाटक करते असे जाहीरच केले आहे. तर मग ठीक आहे, होय मी नाटक करतेय. आता यावर काय म्हणाल तुम्ही?'
पुढे दीपिका म्हणाली की, 'शोएब सोबत असला की, मला एक प्रकारचा आनंद मिळतो. त्याने मला जे प्रेम दिले, ते मला कुणीच दिले नाही. माझ्या बालपणी किंवा मी यश पाहिल्यानंतरही नाही. त्यामुळे तो आनंदी राहावा, यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि तरी देखील कोणाला प्रॉब्लेम असले कर त्यांनी आमचे व्हिडिओ पाहू नयेत,' असे ती म्हणाली.
लग्नाच्या 5 वर्षांनंतर हे कपल होणार आईबाबा
शोएब आणि दीपिकाचे लग्न 22 फेब्रुवारी 2018 रोजी झाले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. दीपिका आणि शोएब यांनी खास अंदाजात त्यांची प्रेग्नेंसी जाहीर केली होती. 22 जानेवारी 2023 रोजी शोएबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लवकरच त्यांचे पहिले बाळ या जगात येणार असल्याचे सांगितले होते.
तो म्हणाला होता, 'आभार, आनंद, उत्साह आणि थोड्या भीतीसह आम्ही तुमच्यासोबत ही बातमी शेअर करत आहोत. हा आमच्या आयुष्यात सर्वात सुंदर क्षण आहे. आमचे पहिले बाळ लवकरच या जगात येणार आहे. आम्ही लवकरच आईबाबा होणार आहोत. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे.'
'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर सुरु झाली प्रेमकहाणी
'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर दीपिका आणि शोएबची प्रेमकहाणी सुरू झाली. या शोमध्ये शोएबने दीपिकीच्या ऑनस्क्रीन पतीची भूमिका साकारली होती, हळूहळू ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपिका कक्करचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न रौनक गुप्तासोबत झाले होते. असे म्हटले जाते की, दीपिका-शोएबची वाढती जवळीक तिचे पहिले लग्न तुटण्यास कारणीभूत ठरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.