आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा फटका:‘बालिका वधू’, 'कुछ तो लोग कहेंगे'च्या दिग्दर्शकावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आली भाजी विकण्याची वेळ

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा फटका एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीलाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने ‘बालिका वधू’ या गाजलेल्या मालिकेचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे

लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने रामवृक्ष आपल्या मूळ गावी, उत्तर प्रदेशमध्ये परतले. येथे ते सध्या भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सध्या ते सायकलवरून दारोदारी जाऊन भाजी विकत आहेत.

  • अनेक मालिकांसाठी केले आहे काम

रामवृक्ष गौड यांनी ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘ज्‍योति’ आणि ‘सुजाता’यासह 25 पेक्षा अधिक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडचे मूळ रहिवासी असलेले रामवृक्ष मुलीच्या परीक्षेसाठी गावी आले होते. परंतु, लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते तिथेच अडकून पडले. गेल्या सहा महिन्यांत जवळचे सगळे पैसे संपले, मुंबईत येणे ही कठीण झाले होते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला.

सद्यपरिस्थिती विषयी रामवृक्ष म्हणाले, सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत त्यामुळे मुंबईमध्ये येणे शक्य नाही. मुंबईतही चित्रपटांचे काम बंद आहे. त्यामुळे या काळात कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी भाजी विकत आहे.

चित्रपट-मालिकांच्या क्षेत्रात येण्यापूर्वी रामवृक्ष वीजवितरण विभागात नोकरी करत होते. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाल्याने, त्यांनी नोकरी सोडून सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कोरोनाचा कहर कमी होताच, ते पुन्हा मुंबईत येऊन नव्या जोमाने कामास सुरुवात करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...