आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्या भटनागर मृत्यू:'तो माझे शारीरिक, मानसिक शोषण करतो, पट्ट्याने मारतो'; दिव्याने मैत्रिणीला सांगितली होती व्यथा, समोर आले चॅट्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गगन दिव्याचा छळ करायचा हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागरचे 10 डिसेंबर रोजी निधन झाले. तिच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मात्र दिव्याचा निधनानंतर तिचा पती गगन गबरू आणि तिच्या नात्याबद्दलचे जे खुलासे झाले आहेत, त्याने अनेकांना धक्का बसला आहे. दिव्याचा पती गगन तिचा छळ करायचा, असा खुलासा अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने केला होता. आता दिव्याची आणखी एक मैत्रीण आणि अभिनेत्री आकांशा मल्होत्रा हिनेदेखील दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरुन गगन दिव्याचा छळ करायचा हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

आकांक्षाने दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स शेअर केले आहेत. यामध्ये दिव्या तिच्या होणाऱ्या छळाविषयी आकांक्षाला सांगताना दिसत आहे. यामध्ये गगन दररोज दिव्याचे मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तसंच तिला धमकीदेखील देत होता असे या चॅट्सवरुन दिसून येत आहे. सोबतच त्याने आपल्याला पट्ट्याने मारहाण केल्याचेदेखील दिव्याने आकांक्षाला सांगितले होते.

दिव्याऐवजी तो एक सुंदर आणि सडपातळ महिला घरकाम करण्यासाठी आणेल, ज्यामुळे त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, अशी धमकी गगन सतत दिव्याला द्यायचा, असे या चॅटवरुन समोर आले आहे.

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. त्यात तिने म्हटले होते की, गगनची अनेक नावं आहेत. तो एक फसवणूक करणारा फ्रॉड माणूस आहे.

दिव्याचा भाऊ देबाशिषने गगनवर आरोप केले
यापूर्वी दिव्याचा भाऊ देबाशिषने गगनवर आरोप केले होते. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, 7 नोव्हेंबरला दिव्याच्या कपाटात त्याला दिव्याने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये गगनने कशाप्रकारे आपल्यावर अत्याचार केले, हे दिव्याने लिहिले होते. घरगुती हिंसाचाराच्या घटनेनंतर दिव्यानेही 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे गगनविरूद्ध एनसी दाखल करण्यासाठी संपर्क केला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser