आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:सहा दिवसांपासून व्हेंटिलेटवर आहे 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागर, कुटुंबीय ती शुद्धीवर येण्यासाठी करत आहेत प्रार्थना

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिचा कोविड - 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री दिव्या भटनागर मागील सहा दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही आणि ते ती शुद्धीवर येण्याची वाट बघत आहेत. दिव्याची तब्येत बिघडल्यानंतर तिला कुटुंबातील सदस्यांनी मुंबईतील सेव्हन हिल्स या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय दाखल केले. तिचा कोविड - 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

'बरे होण्यासाठी 20-25 दिवस लागू शकतात'
दिव्य मराठीसोबत बोलताना दिव्याचा धाकटा भाऊ देव भटनागर म्हणाला, "डॉक्टरांकडून तिला उत्तम ट्रिटमेंट दिली जात आहे. मात्र ताईला बरे होण्यासाठी अजून 20 ते 25 दिवस लागू शकतात. अद्याप ती शुद्धीवर आलेली नाही. आम्ही सर्व तिच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तिची तब्येत ढासळत आहे. कोरोना व्यतिरिक्त तिला हायपरटेन्शनचा त्रास झाला आहे. वैयक्तिक समस्यांमुळे तिने खूप ताणतणावाचा सामना केला आहे, जे तिच्या या अवस्थेसाठी जबाबदार आहे."

नव-याने प्रसिद्धीसाठी रुग्णालयात संपर्क साधला
देवच्या म्हणण्यानुसार, दिव्याचा पती गगनने फक्त प्रसिद्धीसाठी तिच्याशी रूग्णालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो, "गगन आणि त्याचे कुटुंबीय माझ्या बहिणीवर अत्याचार करीत आहेत. दिव्या आयसीयूमध्ये आहेत. असे असूनही ते तिला व्हिडिओ कॉल करत आहेत. ते जाणीवपूर्वक कॉल करत आहेत."

देव पुढे म्हणाला, "अशा परिस्थितीत आपल्या पत्नीचा व्हिडिओ कोण बनवतो? पैसा आणि प्रसिद्धीसाठी ते हे सर्व करत आहेत. दिव्याचा नवरा काहीच कमवत नाही. एकदा माझ्या बहिणीला बरे वाटले तर मग हे प्रकरण बघू."

'आर्थिक स्थिती ठीक आहे, उपचारांचा खर्च उचलू शकतो'
आपली आर्थिक परिस्थिती ठीक असून आपल्या बहिणीचा उपचारांचा खर्च उचलू शकतो, देवने सांगितले. याव्यतिरिक्त, काही असोसिएशन, निर्माता आणि कलाकार देखील दिव्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत.

श्वास घ्यायला त्रास झाल्याने रुग्णालयात केले होते दाखल
दिल्लीहून मुंबईत आलेल्या दिव्याची आई डॉली यांनी सांगितल्यानुसार, “गेल्या सहा दिवसांपासून दिव्याची प्रकृती खालावली आहे. तिला बरं वाटत नाहीये. तिला घरी असताना पाच दिवसांपासून ताप होता. श्वास घ्यायलाही तिला त्रास जाणवत होता. एक्स रे केल्यानंतर तिला निमोनिया झाल्याचे समजले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिव्याची ऑक्सिजनची पातळी तपासली असता तिची ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी झाली होती. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती नाजूक आहे. नुकतेच तिचे रिपोर्ट आले आहेत, ज्यात तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्या व्हेंटिलेटरवर आहे, आम्ही तिच्या प्रार्थना करत आहोत”, असे दिव्याच्या आईने सांगितले.

या मालिकेत केले आहे दिव्याने काम
दिव्याने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गुलाबोची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय 'तेरा यार हूं मैं' , 'उडान', 'जीत गई तो पिया मोरे' आणि 'विष' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser