आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Divyanka Tripathi Gives A Fitting Reply To A Twitter User Who Asked Her To Wear Dupatta During Crime Patrol Episodes

दिव्यांका त्रिपाठीचे सडेतोड उत्तर:नेटक-याने विचारले - 'क्राईम पेट्रोल'च्या एपिसोडमध्ये तुम्ही ओढणी का घेत नाही?, दिव्यांका म्हणाली - कृपया तुमची नियत सुधारा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला ट्रोलर्सची बोलती कशी बंद करावी, हे चांगलेच ठाऊक आहे. अलीकडेच एका युजरने दिव्यांकाला ‘क्राईम पेट्रोल’ या शोमधील तिच्या लूकवरून ट्रोल केले. मात्र दिव्यांकाने तितकेच सडेतोड उत्तर देत या युजरला सुनावले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दिव्यांका त्रिपाठी छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'क्राईम पेट्रोल सतर्क: वुमन अगेन्स्ट क्राईम' या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारतेय. यावरुन एका नेटकऱ्याने दिव्यांकाला सोशल मीडियावर प्रश्न विचारला की, 'क्राईम पेट्रोल शोच्या एपिसोडमध्ये तुम्ही ओढणी का घेत नाही?'

यावर दिव्यांका या नेटक-याला म्हणाली, 'ओढणी न घेतलेल्या मुलींकडे देखील तुमच्या सारख्यांना आदराने पाहण्याची सवय व्हावी यासाठी. महिलांच्या पेहरावाची निंदा करण्याऐवजी कृपया तुमची आणि आसपासच्या मुलांची नियत सुधारा.. माझं शरीर.. माझी अब्रू.. माझी मर्जी, तुमची सभ्यता, तुमची मर्जी,' असे म्हणत दिव्यांकाने नेटक-याची बोलती बंद केली आहे.

एका नेटक-याने उपस्थित केला दिव्यांकाच्या पोस्टवर प्रश्न
आणखी एका नेटक-याने दिव्यांकाच्या या पोस्टवर प्रश्न उपस्थित केला आणि म्हटले, 'अरे मॅडम, तुम्ही तर घनश्याम यांचा बॅण्ड वाजवला. थेट त्यांच्या नियतीवर प्रश्न उपस्थित केला? काय माहित कदाचित ते तुमचे चाहते असतील आणि ओढणीमध्ये तुम्ही त्यांना आवडत असाल."

यावर दिव्यांका म्हणाली, 'हो शक्य आहे. जर ते चाहते असतील तर त्यांच्या प्रेमासाठी सलाम. मात्र महिलांच्या पेहरावावर प्रश्न निर्माण करणे आता जुनी गोष्ट झाली आहे. आपण अभिनय, राजकारण, इतिहास, भूगोल कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो. त्या तुलनेने ओढणी हा खूप तुच्छ विषय आहे,' असे दिव्यांका म्हणाली.

'खतरों के खिलाडी'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे दिव्यांका
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 36 वर्षीय दिव्यांका स्पर्धक म्हणून रोहित शेट्टीच्या स्टंट बेस्ड रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' मध्ये सहभागी झाली आहे. सध्या या शोचे शूटिंग साऊथ आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...