आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती:जेव्हा गर्दीचा फायदा घेऊन तरुणाने चुकीच्या पद्धतीने केला होता स्पर्श, दिव्यांकाने लगावली होती त्याच्या कानशिलात 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्यांकाने त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्यानंतर जमावाने त्याला जोरदार मारहाण केली होती.

'ये है मोहब्बतें' या मालिकेत डॉ. इशिता भल्लाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्यासोबत गैरवर्तन करणा-या व्यक्तीच्या कानाखाली मारल्याचे उघड केले. दिव्यांकाने सांगितल्यानुसार, त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्यानंतर त्या व्यक्तीला जमावाने जोरदार मारहाण केली होती.

  • चित्रपटहगृहात घडली होती घटना

‘ही घटना माझ्यासोबत चित्रपट गृहात घडली होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने विकले जायचे. त्यावेळी चित्रपटगृहांच्या बाहेर प्रचंड गर्दी असायची. मी चित्रपट पाहायला गेले होते. तेव्हा तेथे तिकिट खिडकीजवळ खूप गर्दी होती. मी तिकिट काढायला गेले आणि तेथे माझ्या बाजूला असणारा व्यक्ती माझ्यासोबत गैरवर्तन करु लागला. मला राग आला आणि मी त्याच्या कानशिलात लगावली. मी त्या व्यक्तिचा चेहरा देखील पाहिला नाही’, असे दिव्यांका म्हणाली.

View this post on Instagram

#LateNightPost #MujheMastMahaulMeinJeeneDe kinda pose😜

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on Apr 14, 2020 at 2:29pm PDT

  • दिव्यांका घरी वेळ घालवत होती
  • दिव्यांका घरी वेळ घालवत होती

कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे दिव्यांका मुंबईत पती विवेक दहियासोबत घरी वेळ घालवत आहे. अलीकडेच तिने विवेकबरोबर स्वत: चा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतो तेव्हा मला तुझी खूप आठवण येते. आभारी आहे की या भावनेला काहीच अंत नाही."

  • पंतप्रधान केयर्स फंडात योगदान करण्याचे आवाहन

एका व्हिडिओमध्ये दिव्यांकाने तिच्या चाहत्यांना पीएम केयर्स फंडामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "देशासाठी आपला जीव धोक्यात घालणार्‍या मेडिकल प्रोफेशनल्सप्रमाणे आपणही पीएम केयर्स फंडामध्ये देणगी देऊन मदत करू शकतो. तुम्ही आपल्या घरातून सहजपणे भीम यूपीआय अ‍ॅपमधून देणगी देऊ शकता."

Like all those medical professionals risking their lives for our nation, we can also help by donating to pmcares@sbi. Toh aap bhi aasani se BHIM UPI app se donate karen apne ghar se hi. #PaySafeIndia #IndiaStaySafe #IndiaFightsCorona #UPIChalega @NPCI_@NPCI @upichalega

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on Apr 8, 2020 at 11:49am PDT

बातम्या आणखी आहेत...