आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'दिया और बाती हम' आणि 'कवच 2' सारख्या मालिकांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंग गोयलच्या आईची कोविड - 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. दीपिकाची आई दिल्लीत वास्तव्याला आहे. तर ती स्वतः मुंबईत आहे. आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांना रिपोर्ट न दिल्यामुळे त्यांच्या उपचार प्रक्रियेत अडथळा येत असल्याचे दीपिकाने एक व्हिडीओ शेअर करुन म्हटले आहे. सोबतच तिने दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
दीपिकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन तो मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केला आहे. 'काही दिवसांपूर्वी माझ्या आईची लेडी हार्डिंग हॉस्पिटल येथे कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र अद्याप हे रिपोर्ट आमच्या हातात मिळालेले नाहीत. याप्रकरणी रुग्णालयात संपर्क केला असता त्यांनी केवळ रिपोर्टसचे फोटो काढण्यास सांगितले. मात्र रिपोर्ट हातात दिले नाही. त्यामुळे रिपोर्ट अभावी माझ्या आईवर कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्यात येत नाहीयेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकार कृपया माझी मदत करा”, असे दीपिकाने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
View this post on InstagramA post shared by Deepika Singh Goyal (@deepikasingh150) on Jun 12, 2020 at 6:04am PDT
कुटुंबातील 40 - 45 लोकांना कोरोनाचा धोका
दीपिकाच्या माहेरी 40 ते 45 लोक एकत्र राहतात. या सर्वांना कोरोनाचा धोका असल्याचे तिने म्हटले आहे. व्हिडीओत ती पुढे म्हणाली, 'दिल्लीत माझे मोठं कुटुंब आहे. जवळपास 45 लोकं या कुटुंबात राहतात. त्यामुळे आईला झालेल्या कोरोनाची लागण कुटुंबीयांना होण्याची शक्यता आहे. माझ्या आजीलादेखील आता श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळे कृपया माझी मदत करा'.
घरीच उपचार सुरु
दीपिकाने सांगितले की, दिल्लीतील कोणत्याच रुग्णालयात जागा नसल्यामुळे तिच्या आईला कोणतेही रुग्णालय अॅडमिट करुन घेण्यास तयार नाही. त्यामुळे सध्या घरीच तिच्या आईवर उपचार सुरु आहेत. तिला तातडीने चांगल्या उपचारांची गरज असून एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. पण माझ्याजवळ दिल्लीत एकही सोर्स नाही. केजरीवाल आणि दिल्ली सरकारने मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी माझ्या नव-याच्या नंबर देत आहे, तुम्ही प्लीज त्यांना संपर्क साधा, असे दीपिकाने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.