आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन रेकॉर्ड:दूरदर्शनचे अच्छे दिन परतले,  'रामायण', 'महाभारत'मुळे ठरले नंबर 1 चॅनल, खेड्यांपेक्षा शहरांमधून मिळाले अधिक प्रेक्षक 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएआरसीच्या 13 व्या आठवड्याच्या अहवालात दूरदर्शन 15,96,923 इम्प्रेशन्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.

मुंबई लॉकडाऊनच्या काळात 'रामायण' आणि 'महाभारत' यासारख्या जुन्या मालिकांच्या पुनर्प्रक्षेपणामुळे दूरदर्शनच्या व्युअरशिपमध्ये  मोठी वाढ झाली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार दूरदर्शन सर्व एंटरटेन्मेंट वाहिन्यांना पछाडत पहिल्या स्थानावर गेले आहे. यावर्षी बीएआरसीच्या 13 व्या आठवड्याच्या अहवालात दूरदर्शन 15,96,923 इम्प्रेशन्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, हिंदी जनरल एंटरटेन्मेंट वाहिन्यांच्या यादीमध्येही 15,64,867 सह प्रथम क्रमांकावर आहे.

सर्व जॉनर्समध्ये दूरदर्शनला जवळजवळ 16 लाख इम्प्रेेशन्स मिळाले आहेत.
सर्व जॉनर्समध्ये दूरदर्शनला जवळजवळ 16 लाख इम्प्रेेशन्स मिळाले आहेत.
हिंदी जनरल एंटरटेन्मेंट कॅटेगरीत दूरदर्शन 15.6 लाख इम्प्रेशन्ससह टॉपवर आहे.
हिंदी जनरल एंटरटेन्मेंट कॅटेगरीत दूरदर्शन 15.6 लाख इम्प्रेशन्ससह टॉपवर आहे.
  • आणि हा आहे प्रसार भारतीचा दावा

प्रसार भारतीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असा दावा केला आहे की, दूरदर्शनचे व्युअरशिप एका आठवड्यातच 650 टक्क्यांनी वाढली आहे. 12 व्या आठवड्यात चॅनेलची प्रेक्षक संख्या 267 मिलियनहून अधिक होती, परंतु 13 व्या आठवड्यात ती 2109 मिलियनहून अधिक झाली आहे.

  • ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक व्युअरशिप

खास गोष्ट म्हणजे दूरदर्शनची व्युअरशिप ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये अधिक राहिली आहे. शहरी भागात 9,10,973 च्या इम्प्रेशन्ससह प्रथम क्रमांकावर आहे तर ग्रामीण भागात 6,53.894 इम्प्रेशन्स मिळाले आहेत. येथे ते दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर दंगल चॅनेल असून त्याला 8,82,111 इम्प्रेशन्स मिळाले आहेत.

दंगल 8.8 लाख इम्प्रेशन्सह ग्रामीण भागात टॉपवर आहे, तर दूरदर्शन 6.5 लाख इम्प्रेशन्ससह दुसर्‍या क्रमांकावर आहे.
दंगल 8.8 लाख इम्प्रेशन्सह ग्रामीण भागात टॉपवर आहे, तर दूरदर्शन 6.5 लाख इम्प्रेशन्ससह दुसर्‍या क्रमांकावर आहे.
ग्रामीण भागांपेक्षा दूरदर्शन शहरी भागात अधिक बघण्यात आले. येथे त्याला 9.1 लाख इम्प्रेशन्स मिळाले असून ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
ग्रामीण भागांपेक्षा दूरदर्शन शहरी भागात अधिक बघण्यात आले. येथे त्याला 9.1 लाख इम्प्रेशन्स मिळाले असून ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
  • 40 हजार टक्क्यांनी वाढली व्युअरशिप

बीएआरसी इंडियाच्या अहवालानुसार, लॉकडाऊनमध्ये जुने कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय दूरदर्शनसाठी फायदेशीर ठरल्याचे सिद्ध झाले. यामुळे, सकाळ आणि संध्याकाळच्या बँडमध्ये व्युअरशिप 40 हजार टक्क्यांनी वाढली आहे. फक्त 'रामायण' आणि 'महाभारत' नव्हे तर दूरदर्शनने 80 आणि 90 च्या दशकातील अनेक मालिका त्यांच्या दोन वाहिन्यांवर (डीडी नॅशनल आणि डीडी भारती) पुन्हा प्रसारित केल्या आहेत. यात 'चाणक्य', 'बुनियाद', 'उपनिषद गंगा', 'अलीफ लैला' आणि 'शक्तीमान' सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचा समावेश आहे.

दूरदर्शनने त्याच्या दोन वाहिन्यांवरील अनेक जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे.
दूरदर्शनने त्याच्या दोन वाहिन्यांवरील अनेक जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे.
  • 'रामायण' 5 वर्षात सर्वाधिक पाहिला गेलेला शो

रामानंद सागर यांचा 'रामायण' हा कार्यक्रम 1987 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. त्यावेळी त्याची लोकप्रियता एवढी होती की रस्ते निर्जन असायचे आणि तासन्तास रेल्वे गाड्या थांबविण्यात यायच्या. आणि आजही जेव्हा ही मालिका पुन्हा प्रसारित केली गेली तेव्हा त्याची लोकप्रियता स्पष्टपणे दिसत आहे. हेच कारण आहे की ही पौराणिक मालिका गेल्या 5 वर्षात सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम बनली आहे. 13 व्या आठवड्यात त्याची व्युअरशिप 556 मिलियन इतकी होती, जी मागील पाच वर्षातील कोणत्याही शोसाठी सर्वाधिक आहे. 'महाभारत'ची व्युअरशिप  150 मिलियन आहे.

  • इतर मालिकांचे दर्शक
शोइम्प्रेशन्स  
शक्तीमान20.8 मिलियन
ब्योमकेश बक्षी0.8 मिलियन
बुनियाद0.16 मिलियन
देख भाई देख0.24 मिलियन
सर्कस0.8 मिलियन
  • खासगी वाहिन्यांनाही याचा फायदा

दूरदर्शनप्रमाणेच बर्‍याच खासगी वाहिन्यांनी जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा त्यांना होत आहे. उदाहरणार्थ, स्टार प्लसने 'महाभारत' पुन्हा सुरू केले आहे आणि बीएआरसीच्या 13 व्या आठवड्याच्या अहवालानुसार, त्यास 1.4 मिलियन व्यूअरशिप मिळत आहे. कलर्सने 'राम सिया के लव कुश' आणि अँड टीव्हीवरील 'रामायण' या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण सुरु केले असून त्याला अनुक्रमे 2.1 मिलियन आणि 0.25 मिलियन व्युअरशिप मिळाली आहे.

जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारणामुळे दक्षिण भारतीय वाहिनी असलेले सन टीव्ही दूरदर्शननंतर सर्वात जास्त बघितली गेलेली वाहिनी ठरली आहे. हे 13,06,360 इम्प्रेशन्स मिळाले आहेत. तिस-या क्रमांकावर दंगल असून त्याला 11,51,414 इम्प्रेशन्स मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...