आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुटिंग री-कॉल:भीमासोबतच्या क्लायमॅक्स फाइट सीननंतर पुनीत इस्सरच्या शरीरावर पडले होते काळे-निळे डाग 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्योधनची भूमिका साकारण्यासाठी पुनीत यांनी 22 किलो वजन वाढवून 108 किलो केले होते.

अभिनेते पुनीत इस्सर यांनी बी.आर चोप्रांच्या महाभारतात दुर्योधनची भूमिका साकारली होती. जेव्हा त्यांनी भीमासोबत क्लायमॅक्सच्या फाइट सीनचे चित्रिकरण केले होते, त्यानंतर त्यांचे शरीर काळे-निळे पडले होते. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. लॉकडाऊनच्या काळात डीडी भारतीवर 'महाभारत' ही गाजलेली पौराणिक मालिका प्रसारित केली जातेय. 

या अटीवर मिळाली होती दुर्योधनाची भूमिका 

मुलाखतीत पुनीत इस्सर यांना एका अटीवर दुर्योधनाची भूमिका मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. झाले असे की, भीमाची भूमिका साकारण्यासाठी पुनीत यांच्यापेक्षा जास्त उंचीचा अभिनेता मिळायला हवा, असे मेकर्स म्हणाले होते. पुनीत यांची उंची 6 फूट 3 इंच असून त्यांना दुर्योधनची भूमिका साकारायची होती. परंतु बीआर चोप्रांनी पुनीत यांना भीमाच्या  भूमिकेसाठी कास्ट केले होते.
 
प्रवीण कुमार झाले होते भीम 

या कार्यक्रमात भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार एथलिट आणि दोनदा एशियन गेम्स सुवर्णपदक विजेते होते. त्यांची उंची 6 फूट 8 इंच होती. या भूमिकेसाठी पुनीत यांनी प्रवीणचे नाव सुचवले होते. अशाप्रकारे पुनीत यांना त्यांच्या मनासारखी भूमिका मिळाली.  

शरीरावर काळे निळे डाग पडले होते

पुनीत सांगतात - “दुर्योधन हा माझा ड्रिम रोल होता. निर्मात्यांना बलदंड शरीराचा अभिनेता हवा होता. माझो पिळदार शरीर पाहून त्यांनी मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. या भूमिकेत सर्व काही ठिक होत परंतु भीमासोबत केलेली ती शेवटची फाईट मी कधीही विसरणार नाही. या दृश्याचो चित्रीकरण जवळपास 18 दिवस सुरु होते. भर उन्हात खांद्यावर वजनदार गधा घेऊन मला उन्हात उभे केले जायचे. यामुळे माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. ती फाईट आठवली की आजही मला माझे शरीर काळे निळे पडल्याचा भास होतो.”

लोकांच्या डोळ्यालाही दुखापत झाली होती 

महाभारताचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी सुमारे 18 दिवस लागले. त्यावेळी केबल वर्क नव्हते. आम्हाला स्टंटमॅन किंवा बॉडी डबलशिवाय स्वत:च जंप सीक्वेन्स करावे लागायचे. त्यावेळी दुखापत फारच सामान्य होती. मला आठवत आहे की बाण चालत असताना बर्‍याच जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली होती.

लोक पुनीत यांचा द्वेष करायचे

पुनीत म्हणतात - लोक माझा द्वेष करायचे, ते वाईट म्हणत असतं पण मी ते प्रशंसा म्हणून घेत असे. लोक मला सेटबाहेरही वाईट म्हणायचे आणि माझ्याशी बोलणे टाळायचे. या दरम्यान, पुनीत यांनी कुलीच्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघाताविषयीही सांगितले. महाभारतापूर्वी त्यांना चार वर्षांत फार कमी काम मिळाले, पण त्यात त्यांचे मन रमले नाही. महाभारतासाठी दोन वर्षे कास्टिंग सुरु होते. पुनीत यांना 1986 मध्ये साइन केले गेले होते. दुर्योधनची भूमिका साकारण्यासाठी पुनीत यांनी 22 किलो वजन वाढवून 108 किलो केले होते.

बातम्या आणखी आहेत...