आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इनसाइड स्टोरी:अमली पदार्थ प्रकरणात टीव्ही स्टार सारा खानसह आणखी 8 नावे पुढे येतील

मुंबई / किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाची उद्या चाैकशी

नृत्य दिग्दर्शक व अभिनेत्री सनम जोहर व तिची पार्टनर अबीगैल पांडेही एनसीबीच्या विळख्यात येऊ शकतात. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी ८ नावे पुढे येऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री सारा खानचेही नाव असण्याची शक्यता आहे. अभिनेत्रीसह तिचा मित्र व सहकलाकार अंगद हसीजाही यात सहभागी असू शकतो. अबीगैल याची चौकशी करताना ही नावे समोर आली.

दीपिकाची उद्या चाैकशी : अभिनेत्री दीपिका पदुकोण गोव्यात असल्याने ती शनिवारी मुंबईमध्ये एजन्सीसमोर हजर होईल. सारा अली खानही गोव्यात होती. तीसुद्धा मुंबईत परतली आहे. रुकुलप्रीत सिंह, सारा, श्रद्धा कपूरचीही शनिवारी चौकशी होईल. तळोजा कारागृहात असलेली रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि दीपेश सावंतचीही चौकशी होणार आहे.