आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या 14 व्या सीझनला सुरुवात होऊन 100 हून अधिक दिवस लोटले आहेत. आता या शोमधून अभिनेता एजाज खानने अचानाक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शोमध्ये तो आपल्या रागिट स्वभाव आणि पवित्र पुनियासोबतच्या लव्ह स्टोरीमुळे चर्चेत राहिला आहे.
एजाज 106 दिवस बिग बॉसच्या घरात राहिला. आता कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात देवोलीनाची एंट्री झाल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस एजाजच्या घरातील प्रवासाविषयी सांगताना दिसत आहेत आणि नंतर त्याला घरातून बाहेर येण्यास सांगतात. ते ऐकून घरातील इतर स्पर्धकांना धक्काच बसतो. दरम्यान अर्शी खानला रडू कोसळते.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसचा कालावधी वाढवण्यात आल्याने हे शेड्यूल एजाजच्या दुस-या प्रोजेक्ट्सच्या डेट्ससोबत क्लॅश होत आहे. एजाजला कामात दिरंगाई करणे आवडत नाही. कोरोनामुळे त्याच्या क्रूजवळ काम नव्हते आणि आता तो कामावर वेळेत हजर राहून त्यांना मदत करु इच्छितो. त्यामुळे त्याने आपल्या इतर वर्क कमिटमेंटमुळे बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.