आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ekta Kapoor Birthday: First Job In 17 Years, Ekta Kapoor, Who Has Produced More Than 135 Daily Soaps, Has A Net Worth Of 95 Crores

हॅपी बर्थडे:वयाच्या 17 व्या वर्षी पहिली नोकरी, 135 हून डेली सोपची निर्मिती करणा-या एकता कपूरची एकूण संपत्ती आहे 95 कोटी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील रागावल्याने वयाच्या 17 व्या वर्षी केली होती पहिली नोकरी

टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आज 47 वर्षांची झाली आहे. एकता आज इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी निर्माती आहे, पण तिचा हा प्रवास एवढा सोपा नव्हता. हम पाच, क्योंकी सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की यांसारख्या सर्वोत्कृष्ट दैनंदिन मालिका तयार करून एकताने अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज सुमारे 39 चित्रपट, 45 सिरिज आणि 135 डेली सोपची निर्मिती करणाऱ्या एकताने आपल्या करिअरची सुरुवात एका साध्या नोकरीपासून केली होती. वडील स्टार होते, पण एकताने वडिलांची स्टार पॉवर न वापरता स्वतःचे करिअर यशोशिखरावर नेले. आज तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया कसा राहिला एकताचा आजवरचा प्रवास-

एकता वडिलांच्या नायिकांवर चिडायची
एकता कपूरचा जन्म 7 जून 1975 रोजी मुंबईत झाला. वडील जितेंद्र हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते तर आई शोभा कपूर निर्मात्या होत्या. एकताचे बालपण तिच्या वडिलांमुळे चित्रपटसृष्टीत गेले. परंतु तिला चित्रपटांच्या सेटवर जाण्याची परवानगी नव्हती. एकता कपूर तिच्या वडिलांसाठी खूप पजेसिव्ह होती. त्यामुळे वडील जितेंद्र यांना दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना पाहिले तर एकता त्या अभिनेत्रींवर हल्ला करू शकते, अशी भीती कुटुंबीयांना वाटायची.

वडील रागावल्याने वयाच्या 17 व्या वर्षी केली होती पहिली नोकरी
स्टार किड असल्याने एकता तिचे जवळपास सर्व छंद पूर्ण करत असे, पण एक वेळ अशी आली जेव्हा तिच्या वडिलांनी तिला पॉकेटमनी देण्यास नकार दिला. त्याचे कारण म्हणजे 17 वर्षांची असताना एकता पार्टी करण्यात बिझी असायची. तिचा हा अतिरेक बघून वडिलांनी तिला स्पष्ट सांगितले - एकतर तू लग्न कर, नाहीतर मला हवं तसं काम कर, पार्टी करायची नाही.

वडिलांच्या मदतीने निर्माती झाली

याचा एकतावर इतका खोलवर परिणाम झाला की, तिने अॅड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांच्यासोबत इंटर्नशिप सुरू केली. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर एकताने त्याच जाहिरात कंपनीत काम करायला सुरुवात केली. एकताची आवड पाहून तिच्या वडिलांनी तिला काम सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. पैसे मिळाल्यानंतर एकताने निर्माती म्हणून बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली.

पहिला शो अयशस्वी ठरल्याने 50 लाख रुपये बुडाले

एकता कपूरने काही शो बनवले आणि त्याचे काही भाग चॅनलला दाखवले. सर्व चॅनेल्सनी तिचा शो नाकारला, त्यामुळे तिचे 50 लाख रुपये बुडाले. 1995 मध्ये एकता कपूर निर्मित 'मानो या ना मानो' या शोला झी टीव्ही चॅनलमध्ये स्थान मिळाले. त्याच वेळी तिचा धुन-धमाका हा म्युझिकल प्रोग्राम दूरदर्शनवर प्रसारित झाला. त्याच वर्षी एकताने हम पांच हा शो बनवला जो तिचा पहिला हिट शो ठरला होता.

'के' या अक्षरावर विश्वास असल्याने याच अक्षरावरुन केले 63 शो
एकता कपूरने 1999 मध्ये पहिल्यांदा 'कन्यादान' हा शो बनवला होता. तेव्हापासून एकताने के अक्षरापासून मालिका बनवायला सुरुवात केली. याचे कारण एकताचा ज्योतिषशास्त्रावरील विश्वास होता. 27 वर्षांच्या कारकिर्दीत, एकताने K या अक्षरापासून सुरु होणारे तब्बल 63 शो तयार केले आहेत. त्यातल्या त्यात क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कहानी घर-घर की, कभी सौतन कभी सहेली, कोई अपना सा, कहीं किसी रोज, कुटुंब, कुसुम, कितनी मोहब्बत है, काव्यांजलि, कयामत सर्वात लोकप्रिय होते.

एकता कपूरने केली आहे 39 चित्रपटांची निर्मिती

एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसने 2001 मध्ये आलेल्या क्योंकी... मैं झुठ नहीं बोलता या चित्रपटाद्वारे चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, एकताने कृष्णा कॉटेज, लव्ह सेक्स और धोका, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, रागिनी एमएमएस, हाफ गर्लफ्रेंड, एक व्हिलन, ड्रीम गर्ल यांसारख्या सुमारे 39 चित्रपटांची निर्मिती केली आहे.

95 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे एकता
एकता कपूरचे प्रोडक्शन हाऊस बालाजी प्रोडक्शनची किंमत सुमारे 400 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, एकताची एकूण संपत्ती 95 कोटी आहे. एकताने 2012 मध्ये मुंबईत एक घर खरेदी केले होते, ज्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. घरांव्यतिरिक्त, एकताकडे देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. एकताची वैयक्तिक गुंतवणूक 45 कोटी रुपयांची आहे. बालाजी टेलिफिल्म्स या बॅनरखाली तिने 2012 मध्ये एक संस्थाही सुरू केली आहे. 2017 मध्ये एकताने OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji लाँच केले जे भारतीय टीव्ही शो स्ट्रीम करणारे पहिले डिजिटल अॅप होते.

कार कलेक्शनमध्ये लक्झरी गाड्या

एकता कपूरच्या कार कलेक्शनमध्ये फोर्ड, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारखी लक्झरी वाहने आहेत, ज्यांची एकूण किंमत सुमारे 4-5 कोटी आहे.

लहानपणी लग्नाची आवड होती, आज 47 वर्षांची सिंगल मदर आहे
एकता कपूरला लहानपणापासून लग्न करण्याची खूप इच्छा होती, पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तिचा लग्नावरील विश्वास उडाला. एकता कपूरला कधीच लग्न करायचे नव्हते, पण तिला आई व्हायचे होते. वयाच्या 36 व्या वर्षी एकताने तिचे एग फ्रीज केले. एकता कपूरला 2019 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी सरोगसीद्वारे मुलगा झाला, ज्याचे नाव तिने रवी कपूर ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...