आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ekta Kapoor Instructs Team Members Of 'Kasautii Zindagii Kay 2' To Start Shooting, Parth And Erica Will Shoot From June 20

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुड न्यूज:एकता कपूरने 'कसौटी जिंदगी के 2' च्या टीमला शूटिंग सुरु करण्याचे दिले निर्देश, पार्थ आणि एरिका 20 जूनपासून करणार चित्रीकरण 

किरण जैन, मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील.

पार्थ समथन आणि एरिका फर्नांडिस यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. सूत्रांनुसार, एकता कपूरने आपल्या टीमला 'कसौटी जिंदगी के 2'  या मालिकेचे शूटिंग सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येतील. 

राज्य सरकारने शूटिंगला परवानगी दिल्यानंतर निर्माते आपापल्या टीमशी चित्रीकरण सुरु करण्याबाबत चर्चा करत आहेत. शेवटी या टीमने 20 जूनपासून शूटिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वप्रथम प्रोमो चित्रीत केला जाईल

सुत्रांनी सांगितल्यानुसार,  'पार्थ काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्राला हैदराबादला भेटायला गेला होता. टीमने त्याला मुंबईत येण्यास सांगितले आहे. मुंबई गाठल्यानंतर पार्थला काही दिवस वेगळे क्वारंटाईन राहावे लागेल, त्यानंतरच तो शूट सुरू करू शकेल. हे लक्षात घेऊन शूटिंगचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. टीम सर्वप्रथम कमबॅक प्रोमो शूट करणार आहे, ज्यामध्ये एरिका आणि पार्थ दिसणार आहेत.'

एरिका शूट करण्यास तयार नव्हती

एरिका खरं तर कोरोनाच्या वातावरणात शूटिंगसाठी तयार नव्हती. पण सेटवर सर्व खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन टीमने तिला दिले आहे.

एकताने कलाकारांच्या मानधनात कपात केली नाही

लॉकडाऊनमुळे, काही निर्मात्यांनी त्यांच्या कलाकारांच्या मानधनात कपात केली आहे. मात्र एकताने तसे केले नाही. एकताने तिच्या टीम सदस्यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या पगात मुळीच कपात केली जाणार नाही आणि त्यांना वेळेवर पगार मिळेल.

राजन शाही देखील शूटिंग सुरू करणार 

एकता कपूर व्यतिरिक्त निर्माता राजन शाही यांनी आपल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या टीमला शूटिंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत ते शूटिंगलाही सुरुवात करतील.

बातम्या आणखी आहेत...