आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ekta Kapoor Shares Video Clips Of Urvashi Dholakia Komolika Dialoque Amid Maharashtra Mumbai Coronavirus Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन फन:एकता कपूरने कोमोलिकाची डायलॉग क्लिप शेअर करुन सांगितले - लॉकडाऊन वाढल्यानंतर कोरोना काय विचार करत असेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले - लॉकडाऊन वाढल्यानंतर कोरोना विचार करत असेल...

लॉकडाऊन 2.0 सुरू झाले आहे. याकाळात यूजर्स सोशल मीडियावर जेवढा वेळ घालवत आहेत, त्यात त्यांची सर्जनशीलता आणि विनोदबुद्धी बाहेर येत आहे. दरम्यान, टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या गाजलेल्या 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोमधील कोमोलिका या पात्राची एक मजेदार क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तिची तुलना तिने थेट कोरोनाशी केली आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले - लॉकडाऊन वाढल्यानंतर कोरोना विचार करत असेल...

View this post on Instagram

#corona #lockdown2020 #komolika #music

A post shared by Udit Aggarwal (@udit_calmdev) on Apr 14, 2020 at 11:22am PDT

व्हिडिओत कोमोलिका म्हणजेच उर्वशी ढोलकिया दिसत आहे. या शोमध्ये तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. एकताने शेअर केलेल्या व्हिडिओत डायलॉग्सही ऐकू येत आहेत. मीमरने हा व्हिडिओ एडिट करुन कोरोनाला मध्यभागी ठेवले आहे. लॉकडाऊन वाढल्यानंतर कोरोना काय म्हणत असेल, हे सांगण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. कोरोना म्हणतोय - तुम्ही लोक किती मूर्ख आहेत, तुम्हाला काय वाटते की मी इतक्या सहजतेने निघून जाईन, मी येथे अनेक वर्षे युगानुवर्षे बसून राहणार आहे, मी अजिबात सोडणार नाही, अजिबात नाही.

गेल्यावर्षी आला होता सिक्वेल: एकताने मागील वर्षी 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा सिक्वेल आणला होता. नवीन कलाकारांसोबत ही नवी मालिका शूट केली होती. या मालिकेत कोमोलिका हे पात्र हिना खानने साकारले होते. तर 2001 मध्ये पहिल्यांदा ही मालिका सुरु झाली होती. जी 2008 पर्यंत सुरु होती. मालिकेचे एकूण 1423 भाग टेलीकास्ट झाले होते.

बातम्या आणखी आहेत...