आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:एकता कपूरची मालिका 'नागिन 4' होणार बंद, वाहिनीने निर्मात्यांना शेवटचा एपिसोड शूट करण्यास सांगितले 

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री निया शर्मा 'नागिन 4'मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.

देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि टीव्ही शोचे शूटिंग बंद आहे. यामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर वाईट परिणाम होत आहेत. 'बेहद 2', 'पटियाला बेब्स', 'नजर 2', 'दिल ये जिद्दी है' यासारखे शो मध्येच बंद करावे लागले आहेत. आता या यादीत एकता कपूरच्या 'नागिन 4' या मालिकेचे नाव सामील झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकताचा हा शो वाहिनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यात एक ट्विस्ट देखील आहे.  

  • निर्मात्यांनी शेवटचा भाग शूट करण्यासाठी सांगितले

शोच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "टीआरपी चार्टमध्ये या शोला फारशी कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण फ्रँचायझीची लोकप्रियता लक्षात घेता हा सीझन असा अचानक बंद होणार नाही."  सूत्रांनी पुढे सांगितले, "वाहिनीने निर्मात्यांना महाराष्ट्र सरकारकडून चित्रीकरणासाठी मान्यता मिळताच याचा शेवटचा भाग शूट करायला सांगितले आहे. जेणेकरून प्रेक्षकांना त्याचा शेवट नक्कीच कळू शकेल. तसेच पुढच्या सीझनचा निर्मात्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे."

  • 'नागिन 5' साठी एकताची टीम सज्ज

सूत्रांनी सांगितले की, "वाहिनीच्या प्रस्तावावर एकता खूप समाधानी आहे. तिने तिच्या क्रिएटिव्ह टीमला 'नागिन सीझन 5' वर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकताची टीम कलाकारांच्या निवडीसाठी  व्हर्च्युअल ऑडिशन घेण्यास तयार आहे. 

  • जॅस्मिन, रश्मीने शो सोडला होता

'नागिन 4'मध्ये निया शर्मा आणि विजेंद्र कुमेरिया यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या शोसाठी अभिनेत्री जॅस्मिन भसीनलाही महत्त्वाच्या भूमिकेसाठी साइन करण्यात आले होते. पण काही भागानंतर तिने हा कार्यक्रम मध्यभागी सोडण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी सांगितले की, जॅस्मिन तिच्या पात्रामुळे खूश नव्हती. 

जॅस्मिननंतर निर्मात्यांनी 'बिग बॉस 13' फेम रश्मी देसाईला साइन केले होते. वृत्तानुसार शोच्या घसरत्या टीआरपीला वाचवण्यासाठी निर्माते रश्मीला तिला हवे तेवढे पैसेही देत होते.  मात्र, तिच्या एंट्रीनंतर टीआरपीमध्ये फारसा फरक दिसला नाही. त्यामुळे टीमने रश्मीलाही गुडबाय केले.  

  • 30 एपिसोड्स झाले होते टेलीकास्ट

'नागिन 4'ची सुरुवात 14 डिसेंबर 2019 रोजी झाली होती. 21 मार्च 2020 पर्यंत त्याचे 30 भाग प्रसारित झाले. मात्र, त्यानंतर लॉकडाऊनमुळे नवीन भाग बनवता आले नाहीत आणि आज परिस्थिती अशी आहे की हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...