आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ex Husband Raja Chaudhary Came In Support Of Shweta Tiwari, Said Its Bad Luck That Both Her Marriages Failed

श्वेताच्या समर्थनार्थ पुढे आला पहिला पती:श्वेता तिवारीचा पुर्वाश्रमीचा नवरा राजा चौधरी म्हणाला - ती एक चांगली पत्नी आणि एक उत्कृष्ट आई आहे, दुर्दैवाने तिचे दुसरे लग्न अपयशी ठरले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्दैवाने तिचे दुसरे लग्नही अपयशी ठरले

अभिनेत्री श्वेता तिवारी ही सध्या केपटाउनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’चे चित्रीकरण करत आहे. हा शो आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यात मुलगा रेयांशवरुन सुरु असलेल्या वादामुळे श्वेता सध्या चर्चेत आहे. अभिनवने श्वेतावर अनेक आरोप केले होते. आता श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरी श्वेताच्या समर्थनार्थ पुढे आला असून त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका न्यूज वेबसाइटसोबत बोलताना राजा म्हणाला की, श्वेताचे दुसरे लग्न अपयशी ठरले याचा अर्थ ती वाईट व्यक्ती आहे, असा नाही. श्वेता एक चांगली पत्नी आणि उत्कृष्ट आई असल्याचे राजा म्हणाला आहे.

दुर्दैवाने तिचे दुसरे लग्नही अपयशी ठरले
राजा चौधरी म्हणाला, 'श्वेताचे दोन्ही लग्न मोडल्याचे कारण सारखे आहे. यामुळे लोक श्वेतावर प्रश्न उपस्थित करत आहेत. श्वेता एक उत्कृष्ट आई आणि एक चांगली पत्नी आहे यात शंका नाही. हा केवळ एक योगायोग आणि तिचे दुर्दैव आहे की तिचे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले. याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे किंवा ती वाईट व्यक्ती आहे.’

श्वेताने अभिनवला मुलाला भेटण्याची परवानगी द्यायला पाहिजे
राजा पुढे म्हणाला, श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी. श्वेताला समजायला हवे की तिच्या आणि अभिनवच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असल्या तरी एक वडील आपल्या मुलाचे किंवी मुलीचे कधीही नुकसान करीत नाही,’ असे तो म्हणाला. श्वेता आणि अभिनव यांच्यात मुलगा रेयांशच्या कस्टडीवरुन वाद सुरु आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे.

2007 मध्ये झाला होता श्वेता-राजाचा घटस्फोट

श्वेता आणि राजाचे लग्न सात वर्षे टिकले. त्यानंतर 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांची एक मुलगी असून पलक तिचे नाव आहे. राजापासून घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले होते. पण 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दुस-या लग्नापासून श्वेताला रेयांश हा एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...