आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • FIR Filed In Lucknow And Latur Against Amitabh Bachchan And KBC 12 Makers For Question Related To Manusmriti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायदेशीर अडचणी:अमिताभ बच्चन आणि KBC च्या निर्मात्यांविरोधात FIR, मनृस्मृती विषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिग बी आणि सोनी वाहिनी विरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी तक्रार दाखल केली आहे.

अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर परतले आहेत, मात्र आता या कार्यक्रमावरुन वाद निर्माण झाला आहे. अमिताभ बच्चन आणि सोनी वाहिनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे. मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय लखनऊ येथे देखील याचसंदर्भात एक तक्रार दाखल झाली आहे.

हे आहे संपूर्ण प्रकरण
‘कौन बनेगा करोडपती’च्या 30 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात बेजवाडा विल्सन आणि अनुप सोनी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला आहे. 6.40 लाखांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणता धर्मग्रंथ जाळला होता? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला. या पर्याय होते - A- विष्णुपुराण, B - श्रीमद्भगवद्गीता, C- ऋग्वेद आणि D - मनुस्मृती. या प्रश्नाचे उत्तर होते - मनुस्मृती.

काय म्हणाले अभिमन्यू पवार?
“यामागे मोठा कटकारस्थान आहे. देशातील दोन समाजांना एकमेकांमध्ये भिडायला लावण्याचे काम सोनी वाहिनी आणि अमिताभ बच्चन करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. 298 अ, 153, 290 अशा अनेक कलमांअंतर्गत कारवाई करणे शक्य आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल होईल” असे अभिमन्यू पवार म्हणाले.

कोण आहेत अभिमन्यू पवार?
अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे. लातूरमध्ये भाजयुमोचे ते नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत
लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले.

सोशल मीडियावरदेखील यावरुन टीका सुरु झाली आहे. नेटक-यांनीही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या कार्यक्रमावर केला आहे.