आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Friend And TV Actor Avinash Sachdev Reveals Sameer Didn't Have A Shortage Of Work And He Wasn't In Financial Crises

समीर शर्मा आत्महत्या:मित्र आणि टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवचा खुलासा - 'समीरकडे कामाची कमतरता नव्हती  आणि तो आर्थिक अडचणीतदेखील नव्हता'

किरण जैन, मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अविनाश सचदेवच्या सांगण्यानुसार, त्याच्याकडे आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण नव्हते.

टीव्ही अभिनेता समीर शर्माने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. समीरचा जवळचा मित्र आणि टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवच्या सांगण्यानुसार, त्याच्याकडे आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण नव्हते.

दिव्य मराठीसोबत बोलताना अविनाश म्हणाला, "समीरने असे काही केले आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तो कायम आनंदी राहणारा माणूस होता, माझ्यापेक्षा खूप सकारात्मक व्यक्ती होता. माझे त्याच्याशी 12 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते आणि त्यावेळी तो खूप आनंदी वाटत होता. त्याच्या बोलण्यात मला नैराश्य किंवा तो कुठल्या अडचणीत आहे, असे काहीही वाटले नाही. तो कविता लिहित होता, दोन वेब सिरीजदेखील लिहित होता, त्याच्या हातात जाहिरातींचे अनेक प्रोजेक्ट्स होते. त्याच्याजवळ काम नव्हते किंवा तो आर्थिक अडचणीत होता, असे काहीही नव्हते. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकत नाहीये', असे अविनाश म्हणाला.

या बातचितमध्ये अविनाशने सांगितले की, समीरचे संपूर्ण कुटुंब बंगळुरूमध्ये राहते आणि तो कामासाठी मुंबईत एकटात राहात होता.

फाइल फोटो - समीर शर्मासोबत अविनाश सचदेव
फाइल फोटो - समीर शर्मासोबत अविनाश सचदेव

अविनाश आणि समीरची भेट 'इस प्यार को क्या नाम दूं... एक बार फिरसे' या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली होती आणि ते चांगले मित्र होते. समीरने अविनाशच्या लग्नालादेखील हजेरी लावली होती. समीरसोबत अविनाशची शेवटची भेट जवळपास दीड महिन्यांपूर्वी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...