आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौटुंबिक वाद:श्वेता तिवारीची मैत्रीण अनुराधा सरीनचा खळबळजनक खुलासा, श्वेताची मुलगी पलकला आक्षेपार्ह प्रश्न विचारायचा अभिनव कोहली 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनवने अनुराधा सरीनवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची दिली धमकी

टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. श्वेताने अभिनववर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि तेव्हापासून ते दोघे स्वतंत्र राहत आहेत. अभिनव वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता आणि तिची मुलगी पलक यांच्यावर आरोप करत आहे.

या प्रकरणात श्वेताच्या एका मैत्रिणीने आता उडी घेतली आहे. सोशल मीडियावर तिने अभिनवसंदर्भात काही नवीन खुलासे केले आहेत. श्वेताच्या अनुराधा सरीन नावाच्या मैत्रिणीने अभिनववर श्वेताची मुलगी पलकसोबत गैरवर्तन केल्याचा आणि तिला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे.

अभिनवच्या एका पोस्टवर कमेंट करताना अनुराधाने लिहिले की, 'कोणता बाप आपल्या मुलीला विचारत ती व्हर्जिन आहे की नाही असं विचारतो? कोणता बाप आपल्या मुलीला तू कुणाला किस केलं की नाही असं विचारतो?, कोणता बाप आपल्या मुलीला आक्षेपार्ह्य फोटो दाखवून अशी फिगर बनव, तरंच इंडस्ट्रीत टीकशील…? असं म्हणतो... असे अनुराधाने उघड केले आहे.  

याशिवाय अनुराधाने आणखी एक घटना सांगितली ज्यामध्ये तिने सांगितले की, एकदा पलकला पोटात दुखत होते, तेव्हा  तू प्रेग्नेंट तर नाहीस ना? असे अभिनवने पलकला विचारल्याचे अनुराधाने सांगितले.

अभिनव आणि अनुराधा यांच्या बातचीतचा स्क्रीनशॉट
अभिनव आणि अनुराधा यांच्या बातचीतचा स्क्रीनशॉट

अभिनवने अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची दिली धमकी : अनुराधाच्या या खुलासावर अभिनव चांगलाच संतापला आहे. त्याने अनुराधाविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची  धमकी
दिली आहे. इंस्टाग्रामवर अनुराधाला उत्तर देताना त्याने लिहिले की, 'स्क्रीनशॉट्स घेतले आहेत, आता तू कायदेशीररीत्या अब्रुनुकसानीच्या जाळ्यात अडकणार आहेस. मी श्वेताला यात अडकवणार नाही,
परंतु आता तुझे मी कायदेशीररित्या मी काय हाल करतो ते बघ', असा इशारा अभिनवने अनुराधाला दिला आहे. 

आपल्या मुलाला भेटू न देण्याचा आरोप: यापूर्वी एका मुलाखतीत अभिनवने श्वेतावर मुलगा रेयांशला भेटू न देण्याचा आरोप केला होता. तो म्हणाला होता, 'गेल्या वर्षी सप्टेंबर ते मे 2020 पर्यंत श्वेता
माझ्या संपर्कात होती आणि मी तिची आणि मुलाची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी घेत होतो. गाडीत पेट्रोल भरण्यापासून, रियांशसाठी काहीही खरेदी करण्यापर्यंत मी  सर्वकाही केले. जेव्हा जेव्हा
त्याला काहीही हवे असेल तेव्हा रात्रीचे दोन वाजले असो किंवा चार, मी नेहमीच मदतीसाठी पुढे राहिलो. मला माझ्या मुलाबरोबर राहायचे होते पण ती मला त्याला भेटू देत नाही. ती माझ्याशी
नोकराप्रमाणे वागते.'

श्वेताचे पहिले लग्न मोडलेः श्वेताने 1999 साली वयाच्या 19 व्या वर्षी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि चित्रपट निर्माता राजा चौधरीसोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघे 2000 मध्ये मुलगी पलकचे पालक झाले. 9 वर्षानंतर राजाच्या त्रासाला कंटाळून श्वेताने 2007 मध्ये घटस्फोटाचा खटला दाखल केला आणि ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली होती. घटस्फोटाची प्रक्रिया बर्‍याच दिवसांपर्यंत
चालू राहिली आणि अखेर साडेपाच वर्षांनंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्वेताने 2013 मध्ये अभिनवशी लग्न केले. 2016 मध्ये ती अभिनवच्या मुलाची आई बनली. त्यांच्या मुलाचे नाव
रेयांश असून तो आता 3 वर्षांचा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser