आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौन बनेगा करोडपती12:ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून ते पर्सनल इंटरव्ह्यूपर्यंत, जाणून घ्या तुम्ही घरी बसून 'केबीसी 12' मध्ये कसे सहभागी होऊ शकता

मुंबई (किरण जैन).एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय गेम रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. शोचे होस्ट अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या 12 व्या सीझनमध्ये दिसणार आहेत. शोची रजिस्ट्रेशन  प्रक्रिया 9 मेपासून सुरू झाली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या वातावरणादरम्यान क्विझ शोच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

केबीसीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांच्या निवडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल. ऑडिशन प्रक्रिया चार विभागांमध्ये विभागली गेली आहे - रजिस्ट्रेशन, स्क्रीनिंग, ऑनलाईन ऑडिशन आणि व्यक्तीगत मुलाखत. पहिली फेरी 9 ते 22 मे दरम्यान होईल. रजिस्ट्रेशन प्रक्रिया क्लिअर करणारे अर्जदार संगणकीकृत प्रक्रियेद्वारे शॉर्टलिस्ट केले जातील आणि पुढील फेरीसाठी टेलिफोनद्वारे माहिती दिली जाईल.

यानंतर, ऑनलाईन ऑडिशनमध्ये अर्जदारांना सामान्य ज्ञान चाचणी आणि सोनी लाइव्ह अ‍ॅपद्वारे व्हिडिओ सबमिट करण्यास सांगितले जाईल. अखेरीस निवड झालेल्यांना पर्सनल व्हिडिओ कॉलसाठी आमंत्रित केले जाईल, त्यानंतर निवडक लोकांना स्टेजवर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल.

 

  • असे सहभागी होऊ शकता

स्टेप 1 – नोंदणी

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन KBC च्या 12व्या सीझनची नावनोंदणी 9 मे पासून सुरू करून 22 मे पर्यंत चालू ठेवेल. अमिताभ बच्चन दररोज रात्री 9.00 वाजता सोनी टीव्हीवर एक नवीन प्रश्न विचारतील. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे SMS किंवा सोनीलिवच्या माध्यमातून देऊ शकाल.

स्टेप 2 – स्क्रीनिंग

नोंदणी प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या लोकांमधून, काही पूर्व-निर्धारित नोंदणी निकषांच्या आधारे यादृच्छिक (रॅन्डम) रित्या काही प्रतिस्पर्धी निवडण्यात येतील, ज्यांचा पुढील मूल्यमापनासाठी टेलीफोनवरून संपर्क साधण्यात येईल.

स्टेप 3 – ऑनलाइन ऑडिशन

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच, सामान्य ज्ञान चाचणी आणि व्हिडिओ सबमिशनसह सोनीलिवच्या माध्यमातून ऑडिशन्स घेण्यात येतील. हे एक खूप कठीण काम वाटत असले, तरी एका साध्या ट्यूटोरियलच्या माध्यमातून त्याचे सर्व तपशील समजावून सांगण्यात येतील. हे ट्यूटोरियल सोनीलिववर सहज उपलब्ध असेल.

स्टेप 4 – व्यक्तीगत मुलाखत

ऑडिशनमधून निवडलेल्या लोकांची शेवटच्या फेरीत व्यक्तीगत मुलाखत घेण्यात येईल, जी व्हिडिओ कॉलमार्फत योजण्यात येईल. यानंतर ते लोक टॉप 10च्या क्लस्टरमध्ये सामील होतील. तेथून फास्टेस्ट फिंगर राऊंड आणि अखेरीस अमिताभ बच्चनयांच्यासोबत खेळण्याची संधी मिळेल.  एका स्वतंत्र ऑडिट कंपनीद्वारे या संपूर्ण निवड प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल. 

साधारणपणे नोंदणीनंतर, सहभागींना वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये बोलावले जाते आणि त्यांची पडताळणी केली जाते, परंतु यावेळी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होईल. या कार्यक्रमाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार,  या डिजिटल प्रक्रियेस सुमारे तीन महिनेही लागतील आणि जर सर्व काही ठीक झाले तर ऑगस्टच्या अखेरीस या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...