आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Tv
 • From Sunil Grover's 'Gangs Of Filmistan' To Shweta Tiwari's 'Mere Dad Ki Dulhan', 15 TV Shows Are Going Off Air In 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही इंडस्ट्रीसाठी अनलकी ठरले 2020 हे वर्ष:सुनील ग्रोव्हरच्या 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान'पासून ते श्वेता तिवारीच्या 'मेरे डॅड की दुल्हन'पर्यंत, 2020 मध्ये हे 15 टीव्ही शो झाले  ऑफ एअर

किरण जैन25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • टीव्ही इंडस्ट्री पुन्हा कामाला लागली, मात्र परिस्थितीत फारशी सुधारणा दिसून येत नाहीये.

कोरोना व्हायरसमुळे भारतीय टेलिव्हिजन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांत टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग पूर्णपणे रखडले होते. यावेळी, अनेक वाहिन्यांनी त्यांचे शोज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांनंतर टीव्ही इंडस्ट्री पुन्हा कामाला लागली, मात्र परिस्थितीत फारशी सुधारणा दिसून येत नाहीये.

2020 मध्ये असे बरेच टीव्ही शो आहेत जे ग्रॅण्ड लेव्हलवर लाँच केले गेले होते, परंतु टीआरपी नसल्यामुळे ते बंद करावे लागले. एकता कपूर निर्मित 'कसौटी जिंदगी के 2' मध्ये एरिका फर्नांडिस, हिना खान, पार्थ समथान, करणसिंग ग्रोव्हर आणि आमना शरीफ सारख्या बड्या कलाकारांची फौज असूनही हा शो लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाला नाही. हीच परिस्थिती जेनिफर विंगेटच्या 'बेहद 2'ची आहे. ही मालिकादेखील भव्य स्तरावर लाँच करण्यात आली, परंतु सीजन 2 ची कथा प्रेक्षकांना आवडली नाही. लॉकडाऊन दरम्यान चॅनेलने शो बंद करण्याचा निर्णय घेतला. 2020 या वर्षात हे एक दोन नव्हे तर तब्बल 15 शोज ऑफ एअर झाले आहेत.

कसौटी जिंदगी के 2

दिव्य मराठीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान कसौटी जिंदगी के 2 मधील अभिनेत्री शुभवी चौकसीने सांगितले, "कसौटी जिंदगी के 2 ही मालिका बंद होत असल्याचे जेव्हा आम्हाला प्रोडक्शन हाऊसकडून समजले, तेव्हा मला धक्का बसला. मला थोड्या काळासाठी काहीच समजू शकले नाही. मात्र हेच सत्य आहे. आमच्या कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली, मात्र लॉकडाऊनमुळे थोडा ब्रेक लागला. ज्यानंतर लोक मालिकेसोबत कनेक्ट होऊ शकले नाहीत. पण मी माझा हा प्रवास कधीही विसरणार नाही. या मालिकेने मला खूप काही दिले आहे."

शुभारंभ
'शुभारंभ' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री महिमा मकवाना म्हणाली, "टीआरपी आमच्या शोचे भविष्य ठरवते हे नाकारता येत नाही. गेल्या काही आठवड्यांपासून आमच्या शोची टीआरपी अपेक्षेपेक्षा कमी येत होता. आमच्या शोच्या निर्मात्यांनी बराच बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. स्टोरी लाईन बदलण्यापासून ते नवीन पात्रांच्या एन्ट्रीपर्यंत त्यांनी हा कार्यक्रम वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय चॅनेलला घ्यावा लागला."

गँग्स ऑफ फिल्मिस्तान
अलीकडेच सुरू झालेला गँग्स ऑफ फिल्मिस्तान हा शोदेखील आता बंद झाला आहे. शोच्या निर्मात्या प्रीती सिमोसच्या म्हणण्यानुसार, हा शो फक्त 50 एपिसोड्ससाठी होता, त्यानंतर तो बंद करण्यात आला. आहे.

हे शो 2020 मध्ये ऑफ-एअर झाले

 • मेरी गुडिया - डिसेंबर 2019 - मार्च 2020
 • नागिन 4 - नोव्हेंबर 2019 - ऑगस्ट 2020
 • शुभारंभ - डिसेंबर 2019 - ऑक्टोबर 2020
 • पटियाला बेब्स - नोव्हेंबर 2018 - ऑगस्ट 2020
 • नजर 2 - नोव्हेंबर 2018 - मार्च 2020
 • बेहद 2 - डिसेंबर 2019 - मार्च 2020
 • प्यार की लुका चुप्पी - डिसेंबर 2019 - सप्टेंबर 2020
 • इश्क सुभान अल्लाह - मार्च 2018 - ऑक्टोबर 2020
 • अकबर का बल बीरबल - ऑगस्ट 2020 - नोव्हेंबर 2020
 • पवित्र भाग्य - मार्च 2020 - ऑक्टोबर 2020
 • कसौटी जिंदगी के 2 - सप्टेंबर 2018 - ऑक्टोबर 2020
 • इशारों इशारों में - जुलै 2019 - मार्च 2020
 • दिल जैसे धडके धडकने दो - फेब्रुवारी 2020 - मार्च 2020
 • मेरे डॅड की दुल्हन - नोव्हेंबर 2019 - नोव्हेंबर 2020
 • गँग्स ऑफ फिल्मिस्तान - ऑगस्ट 2020 - ऑक्टोबर 2020