आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Gauhar Khan Arrives Dubai With Boyfriend Zaid Darbar Before Marriage, Pictures Of Mini Holiday With Humsafar Came Out

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव्हबर्ड्स:लग्नापूर्वी बॉयफ्रेंड झैद दरबारसह दुबईत पोहोचली गौहर खान, समोर आली मिनी हॉलिडेची छायाचित्रे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुटी एन्जॉय करतानाची दोघांची काही छायाचित्रे समोर आली आहेत.

बिग बॉस 7 ची विजेती गौहर खान सध्या आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गौहर येत्या 24 डिसेंबर रोजी प्रियकर झैद दरबारसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान गौहर आणि नृत्य नृत्यदिग्दर्शक झैद मिनी हॉलिडेसाठी दुबईला पोहोचले आहेत. सुटी एन्जॉय करतानाची दोघांची काही छायाचित्रे समोर आली आहेत.

झैद दरबारने गौहर खानसोबतचे एक सुंदर छायाचित्र शेअर केले असून त्यात त्यांच्या दुबई व्हेकेशनची झलक दिसते. यात गौहर ब्लॅक टी-शर्ट आणि यलो पँटमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे झैदने डेनिम आणि टी-शर्टसह सिंपल लूक ठेवला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना झैदने लिहिले, ''हाय दुबई. मी परतलो आहे, पण यावेळी माझी जोडीदार गौहर खान माझ्यासोबत आहे.'' सोशल मीडियावर गौहर-झैद या जोडीला हॅश टॅग गाझा हे नाव देण्यात आले आहे.

5 नोव्हेंबर रोजी साखरपुड्याची केली होती घोषणा

गौहर खान आणि झैद गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. 5 नोव्हेंबर रोजी गौहरने झैदसोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. या लव्ह बर्डने एंगेजमेंट रिंगच्या इमोजीसह आपले रोमँटिक फोटो शेअर केले होते. यानंतर झैदची आई फरजाना, भाऊ आवेज आणि बहीण अनम यांनी होणारी वहिनी गौहरचे घरी स्वागत केले होते.

24 डिसेंबर रोजी होणार आहे लग्न

गौहर 24 डिसेंबर रोजी झैदसोबत मुंबईत निकाह करणार आहे. कोरोना महामारीमुळे लग्नात अगदी मोजके पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नात सहभागी होण्यासाठी गौहरची मोठी बहीण निगार आणि कुटुंबीय लवकरच दुबईहून मुंबईत येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...