आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Genelia D'Souza Reveals On Super Dancer 4 Set Why Riteish Deshmukh Had To Touch Her Feet 8 Times During Their Wedding

'सुपर डान्सर 4':जेनिलिया डिसुजाचा खुलासा -  'लग्नात रितेश तब्बल आठवेळा माझ्या पाया पडला होता'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी या दोघांनीही शोमध्ये भरपूर धमाल मस्ती केली.

बॉलिवूडची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुजा यांनी 'सुपर डान्सर 4'च्या वेडिंग स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही शोमध्ये भरपूर धमाल मस्ती केली. शिवाय आपल्या फेअरी टेल वेडिंगचे खास किस्सेही सांगितले. जेनिलियाने सांगितल्यानुसार, लग्नात रितेश जेनेलियाच्या तब्बल आठवेळा पाया पडला होता.

'सुपर डान्सर 4' मधील मुख्य परीक्षक शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा पोर्न रॅकेट प्रकरणात अडकल्यानंतर ती या शोमध्ये सहभागी होत नाहीये. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला शोमध्ये सेलिब्रिटी पाहुणे परीक्षक म्हणून दिसत आहेत. यावेळी रितेश आणि जेनिलिया यांनी खास हजेरी लावली.

काय सांगितले जेनिलियाने?
जेनिलियाने सांगितले की, 'या सर्व स्पर्धकांचे सादरीकरण पाहून मला माझे लग्न आठवले. आता आपण भलेही लग्न मोठ्या दिमाखात आणि वेगळ्या स्टाइलने साजरं करायला लागलो आहोत परंतु, पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या लग्नासोबत माझ्या भावना जोडलेल्या आहेत. मला आनंद आहे की माझे लग्न अशाच पद्धतीने झाले. आमच्या लग्नातील प्रत्येक समारंभ एक जबरदस्त धमाका होता. मी पाठवणी करताना खूप रडले होते आणि रितेश तब्बल आठवेळा माझ्या पाया पडला होता.' यावर रितेश म्हणाला, 'मला वाटतं की भटजींना माहीत होते की पुढे आयुष्यभर मला काय करायचे आहे. त्यामुळे त्यांनी तेव्हाच माझ्याकडून प्रॅक्टिस करवून घेतली.'

लग्नाला झाली 9 वर्षे
रितेश आणि जेनिलिया यांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले होते. दोघांची पहिली भेट तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हे दोघे दोन
मुलांचे आईबाबा आहेत. रितेशने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेनिलियासोबत त्याचे क्वचितच भांडण होते. दोघांमध्ये मतभेद होतात, पण ते कधीही एकमेकांवर ओरडत नाहीत. जर दोघांमध्ये
काही वाद झाले, तर रितेश जेनिलियाला सॉरी म्हणून तिची समजूत काढतो.

बातम्या आणखी आहेत...