आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये गोड बातमी:'बालिका वधू' फेम स्मृती खन्ना-गौतम गुप्ताच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी स्मृती खन्ना-गौतम गुप्ता यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टीव्ही अभिनेत्री स्मृती खन्नाच्या घरी पाळणा हलला आहे. स्मृतीने 15 एप्रिल रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.  मुलीचा पहिला फओटो पोस्ट करुन स्मृतीने लिहिले, - 'माझी राजकुमारी 15 एप्रिल रोजी आली आहे.'

View this post on Instagram

Our princess has arrived 💗 15.04.2020

A post shared by Smriti Khanna (@smriti_khanna) on Apr 15, 2020 at 9:28am PDT

अभिनेत्री किश्वर मर्चंटने लिहिले- 'तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.' अभिनेता अर्जुन बिजलानीने लिहिले- 'तुम्हा दोघांचे अभिनंदन. मी खूप आनंदी आहे राजकुमारीला प्रेम आणि आशीर्वाद. पॅरेंट्स गँगमध्ये आपले स्वागत आहे.' मौनी रॉयने लिहिले- 'तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन आणि बाळाला आशीर्वाद.'

गरोदरपणात स्मृती खन्ना सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत होती. अलीकडेच स्मृतीने तिचा नवरा गौतम गुप्ताला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने लिहिले होते, 'तुझ्या वाढदिवसाची भेट यायला थोडा उशीर झाला आहे परंतु ती आता कधीही येऊ शकते.' स्मृतीने 'मेरी आशिकी तुमसे ही', 'बालिकावधू', 'कसम तेरे प्यार की' आणि 'इस प्यार को क्या नाम दूं 3' यासह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...