आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • 'Guddan Tumse Na Ho Payega' Actress Rashmi Gupta Gets Cheated In Love, Said 'I Was Left Saying That I Am An Actress And This Job Is Uncertain'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती:'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' फेम अभिनेत्री रश्मी गुप्ताला प्रेमात मिळाला विश्वासघात, म्हणाली- मला फसवून दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत त्याने लग्न केले

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रश्मीने एका मुलाखतीत ब्रेकअपचे कारण सांगितले.

छोट्या पडद्यावरील गुड्डन तुमसे ना हो पाएगा या मालिकेत अभिनेत्री रश्मी गुप्ता सरस्वती जिंदालची भूमिका साकारत आहे. ये वादा रहा या शोमधील तिच्या को-स्टारसोबत रश्मी रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्याच्याकडून प्रेमात तिचा विश्वासघात झाला. आता ब्रेकअपच्या वर्षभरानंतर रश्मीने यासंदर्भात आपले मन मोकळे केले आणि ब्रेकअपचे कारण सांगितले.

अलीकडेच रश्मी गुप्ताने स्पॉटबॉयला सांगितले की, “ये वादा राहा या मालिकेच्या निमित्ताने आमची भेट झाली होती. त्यावेळी मुंबईत मी नवखी होते. एकत्र काम करत असल्याने आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली. एका पार्टीत त्याने मला प्रपोज केले. परंतु सुरुवातीला मी त्याला नकार दिला. जवळपास दोन महिने तो माझ्या होकाराची वाट पाहात होता. आपण दोघेही उत्तर प्रदेशातील आहोत आणि आपल्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होणार नाही, असे तो मला म्हणाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना देखील मी भेटले होते. त्याच दरम्यान मी त्याला होकार दिला.''

View this post on Instagram

Lets flip over to Traditional💙

A post shared by Rashmi Gupta (@rashmiguptaa09) on Aug 30, 2020 at 11:52pm PDT

रश्मीने पुढे सांगितले, सहा महिने आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठिक होते. शोला 100 एपिसोड पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पार्टीत तो आपल्या एक्स गर्लफ्रेंडची सगळ्यांशी ओळख करुन देत असल्याचे मी पाहिले. ते पाहून मी खूप खचले. मी त्याला याबाबत विचारची पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊन विषय टाळायचा. आणि एके दिवशी त्याने माझ्यासोबत ब्रेकअप करुन दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत लग्न केले.” असा अनुभव रश्मीने सांगितला.

बातम्या आणखी आहेत...