आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Gurmeet Chaudhary Remembered The Old Days, Said People Started Putting Our Pictures With God In Their Temple

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रामायण'चे पुन:प्रक्षेपण:गुरमीत चौधरीला आठवले जुने दिवस, म्हणाला- 'लोकं आमची छायाचित्रे मंदिरात देवाशेजारी ठेऊ लागले होते'

मुंबई (किरण जैन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रामायण' नंतर आम्हाला शिव, विष्णू आणि अनेक देवतांच्या भूमिकांची ऑफर मिळाली, पण आम्ही त्याला नकार दिला.

'रामायण' शोचा रिमेक दंगल टीव्हीवर पुन्हा प्रसारित केला जात आहे. 'रामायण'मधील रामची भूमिका अभिनेता गुरमीत चौधरीने साकारली होती. तर सीतेच्या भूमिकेत त्याची पत्नी देबिना बॅनर्जी झळकली होती.  या रामायणाची निर्मितीही सागर आर्ट्सनेच केली होती. अलीकडेच दिव्य मराठीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान गुरमीतने रामायणाशी खास काही गोष्टी शेअर केल्या.

राम-सीतेची भूमिका साकारुन लग्न करणे आपल्या देशात पहिल्यांदाच झाले : 'रामायण' माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. देबीना (गुरमीतची पत्नी) बरोबरची ही माझी पहिलीच मालिका होती. आम्ही कदाचित पहिले असे कलाकार असू ज्यांनी आयकॉनिक भूमिका साकारणा-या ख-या आयुष्यातही लग्न केले. आम्ही आजही जेव्हा रामायण बघतो, तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात.  आजच्या काळात असा मॅथॉलॉजिक शो पाहणे खूप महत्वाचे आहे, यात बरेच काही शिकण्यासारखे आहे. आता आपल्या सर्वांना वेळ मिळाला आहे, तो गमावू नये.

आमचा हा शो व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्च्या बाबतीत चांगला आहे : प्रेक्षक विभाजित झाल्याचे नाकारता येत नाही, कारण रामानंद सागर यांचे रामायण पुन्हा प्रसारित झाले आहे. तसे, आमचे रामायण आणि जुने रामायण एकाच प्रॉडक्शन हाऊसने बनवले आहे, म्हणून भावना आणि कथा देखील एकसारख्याच आहेत. फरक फक्त तंत्रज्ञानात आहे. आमच्या शोचे व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्टर खूप चांगले आहेत आणि तपशीलवार देखील आहे.

लोक आमची छायाचित्रे मंदिरात ठेवत असत: या शोच्या शूटिंग दरम्यान आम्हाला त्याच्या लोकप्रियतेविषयी फारशी माहिती नव्हती. दीड महिन्यानंतर लोक आम्हाला मेसेज करु लागले तेव्हा आमच्या लक्षात आले की आपला शो हिट झाला आहे. लोक माझा आणि देबिनाचा फोटो त्यांच्या मंदिरात देवाच्या फोटोजवळ ठेवत असत. आम्ही फक्त 21 वर्षांचे होतो आणि लोक आम्हाला देव मानत होते. जेव्हा आम्ही बाहेर निघायचो, तेव्हा लोक आमच्या पायाला स्पर्श करुन पैसे ठेवत होते, त्यामध्ये 101, 501, 1001 रुपये शुभ स्वरुपात दिले जायचे. 

'रामायण' नंतर 6 महिन्यांपर्यंत, मी आणि देबिनाने काम नाकारले : 'रामायण' नंतर आम्हाला शिव, विष्णू आणि अनेक देवतांच्या भूमिकांची ऑफर मिळाली, पण आम्ही त्याला नकार दिला. आपली इंडस्ट्री खूप लवकर टाइप कास्ट करते. आणि आम्हाला ते नको होते. जवळपास 6 महिन्यांपर्यंत, मी आणि देबिनाने काम नाकारले जेणेकरुन आम्ही काहीतरी वेगळे करू शकू. आम्ही बरेच तरुण होतो आणि केवळ कॉश्च्युम ड्रामाचा भाग बनू इच्छित नव्हतो. आम्हाला टाईप कास्ट व्हायचे नव्हते. त्यावेळी हा एक कठीण टप्पा होता, परंतु आमच्या कारकीर्दीचा हा सर्वात चांगला निर्णय होता.

लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले : जयपूरमध्ये मी माझ्या आगामी 'द वाइफ' चित्रपटाचे शूटिंग करत होतो, मात्र या लॉकडाऊनमुळे आम्हाला आमचं शूटिंग थांबवावं लागलं. आम्ही सर्व या लॉकडाऊनच्या समाप्तीच्या प्रतीक्षेत आहोत जेणेकरुन आम्ही आमचे काम पुन्हा सुरु करू शकू.

बातम्या आणखी आहेत...