आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा:देबिना बॅनर्जीने दिला मुलीला जन्म, गुरमीत चौधरीने व्हिडिओ शेअर करुन दिली आनंदाची बातमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या जोडप्याने 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नगाठीत बांधली.

अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी पहिल्यांदाच आई-वडील झाले आहेत. रविवारी (3 एप्रिल) देबिनाने एका मुलीला जन्म दिला. स्वतः गुरमीतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यासह गुरमीतने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. देबिनाने काही महिन्यांपूर्वीच तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत.

गुरमीतने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे

गुरमीतने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये देबिनाचा हात त्याच्या हातात आहे आणि जेव्हा देबिना तिचा हात उघडते तेव्हा चिमुकलीचा हात दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करत गुरमीतने कॅप्शनमध्ये लिहिले, "आम्ही आमच्या बाळाचे या जगात स्वागत करतो... 3-4-2022, तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद."

रिअ‍ॅलिटी शोमध्ये केले होते प्रपोज
'पती, पत्नी और वो' या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान गुरमीतने देबिनाला प्रपोज केले होते. 2008 मध्ये 'रामायण' या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. या मालिकेत त्यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. येथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि छोट्या पडद्यावरील या जोडप्याने 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नगाठीत बांधली.

बातम्या आणखी आहेत...