आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:गुरमीत चौधरीने टीव्हीवर रामची भूमिका साकारून निर्माण केली ओळख, बॉलिवूडमध्ये चित्रपट नाकारल्याने दिग्दर्शकाकडून मिळाली होती धमकी

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही सीरियल 'रामायण'मध्ये 'राम'ची भूमिका साकारून गुरमीतने लोकप्रियता मिळवली.

अभिनेता गुरमीत चौधरीचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 फेब्रुवारी 1984 रोजी चंदीगडमध्ये त्याचा जन्म झाला. गुरमीतचे वडील सीताराम चौधरी हे निवृत्त आर्मी सुभेदार मेजर आणि आई अनमोल या गृहिणी आहेत. तर थोरला भाऊ गंगाराम चौधरी डॉक्टर आहे.

टीव्ही सीरियल 'रामायण'मध्ये 'राम'ची भूमिका साकारून गुरमीतने लोकप्रियता मिळवली. 'गीत हुई सबसे पराई' आणि 'पुनर्विवाह' सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या गुरमीतने महेश भट्ट यांच्या 'खामोशियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

'खामोशियां' चित्रपटातील एका दृश्यात गुरमीत.
'खामोशियां' चित्रपटातील एका दृश्यात गुरमीत.

गुरमीतला दिग्दर्शकाकडून मिळाली होती धमकी

गुरमीत जेव्हा चित्रपटांमध्ये आला तेव्हा त्याला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, 'मी जेव्हा चित्रपटात आलो तेव्हा एक चांगले दिग्दर्शक भेटले होते, त्यांचे खूप नाव होते आणि त्यांनी मला घरी बोलावून नरेशन दिले होते. पण मला तो चित्रपट समजला नाही. आजच्या काळात असे घडते की जर तुम्हाला चित्रपट समजला नाही तर तुम्ही नकार देऊ शकता. जेव्हा मी हे केले तेव्हा ते म्हणाले की, मी तुला कोणताही चित्रपट करू देणार नाही.'

गुरमीत पुढे म्हणाला, 'मला धक्काच बसला की हे काय आहे! एखाद्या कलाकाराला स्क्रिप्ट आवडली नाही तर तो नाही म्हणू शकतो. पण मला सांगण्यात आले की ते मला कधीही काम करू देणार नाही.' त्यांनी पुढे मला म्हटले होते की, 'तू माझा चित्रपट कसा नाकारलास, तुला काय वाटतं, माझा चित्रपट गलिच्छ आहे...?'

दोघांनी 2011 मध्ये लग्न केले.
दोघांनी 2011 मध्ये लग्न केले.

शूटिंगदरम्यान देबिनाच्या पडला प्रेमात
गुरमीत आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी हे टीव्हीच्या आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी 'रामायण' या मालिकेत एकत्र काम केले होते, पण दोघांची ही पहिलीच मालिका नव्हती. गुरमीत आणि देबिना यांची भेट 2004 साली एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी तामिळ टीव्ही मालिका 'मायावी'मध्येही एकत्र काम केले.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रपोज केले
'पति, पत्नी और वो' या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान गुरमीतने देबिनाला प्रपोज केले, त्यानंतर 2011 मध्ये दोघांनी एका खासगी समारंभात लग्न केले. देबिना आणि गुरमीत यांची भेट पुन्हा एकदा 2008 मध्ये 'रामायण' या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत त्यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. येथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि छोट्या पडद्यावरील या जोडप्याने 15 फेब्रुवारी 2011 रोजी खऱ्या आयुष्यात लग्न केले.

11 वर्षांनी होणार आहेत आईबाबा
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी लवकरच आई-वडील होणार आहेत. स्वतः गुरमीतने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गुरमीतने त्याच्या अधिकृत अकाऊंटवर पत्नी देबिनासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये देबिनाचा बेबी बंप दिसत आहे. हा फोटो शेअर करत गुरमीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "चौधरी ज्युनिअर येत आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे."

बातम्या आणखी आहेत...