आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपबीती:'हमारी बहू सिल्क' फेम चाहत पांडे म्हणाली - भाडे देऊ न शकल्याने घरमालकाने घर रिकामे करण्यास सांगितले होते  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी जून महिन्यात 'हमारी बहू सिल्क' हा शो सुरु झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये याचे प्रक्षेपण थांबवण्यात आले.

'हमारी बहू सिल्क' या मालिकेचे  निर्माते गेल्या काही दिवसांपासून कास्ट आणि क्रू मेंबर्सला पगार न दिल्यामुळे वादात सापडले आहेत. आता या प्रकरणात शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री चाहत पांडेने मोठा खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ब-याच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने तिची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची झाली होती की, तिच्याकडे घरभाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे तिच्या घर मालकाने तिला घर रिकामे करण्यास सांगितले होते.

  • 'शो दरम्यान आपली सर्व कमाई खर्च केली होती'

चाहतने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, "माझ्या मागील शोजमधून मी कमावलेले सर्व पैसे 'हमारी बहु सिल्क'च्या वेळी खर्च केले होते. मग प्रवास असो, खाणेपिणे असो, किंवा घरभाडे  देणे असो.. या सर्व गोष्टी करताना माझी बचत संपली. त्यावेळी मी निर्मात्यांकडून माझ्या मानधनाची रक्कम मागत होती, पण चॅनलकडून त्यांना पैसे मिळाले नाहीत, हेच कारण ते मला सांगत राहिले. गोष्टी माझ्या हातातून निसटत चालल्या होत्या. माझ्याजवळ पैसे नव्हते आणि मला घराचे भाडे भरायचे होते."

चाहत पुढे म्हणाली, "चूक घरमालकाची नव्हती. कारण त्यालाही साहजिकच पैशांची गरज होती. कोणी आपल्या पैशांची किती वेळ वाट बघणार? शेवटी एक दिवस घरमालकाने पैसे द्या किंवा घर रिकामे करा, असे मला सांगितले. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी शोच्या एका निर्मात्याच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे रडू लागले. मी त्याला विनंती केली की, माझे पैसे मला द्या. पण त्यांनी मझ्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि सांगितले की त्यांच्याकडे पैसे नाही. "

चाहतने सांगितल्यानुसार, शो बंद झाल्यानंतर आठ महिन्यांनी सर्व गोष्टी आणखी बिघडू लागल्या. तिने या बातचीतमध्ये इंडस्ट्रीत चांगले लोक असल्याचेही म्हटले. कारण तिला 'तेनाली रामा', 'अलादीन' आणि 'राधा कृष्णा'सारख्या शोसाठी पैसे मागण्याची गरज पडली नाही. 

  • आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातमीचे केले खंडन

अलीकडेच शोचा मुख्य अभिनेते जान खानने दावा केला होता की, आर्थिक अडचणींमुळे चाहतने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चाहतने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. तिच्या मते, जानचा तिच्या आईच्या शब्दांमुळे गोंधळ झाला असावा.

ती म्हणते, "एक दिवस आम्ही एका ग्रुप कॉलवर पेमेंटच्या विषयावर चर्चा करीत होतो. त्या दिवशी माझी आई खूप चिडली होती. ती म्हणाली - 'जर माझ्या मुलीने उलटसुलट काही केले तर त्याला जबाबदार कोण असेल?' मला असे वाटते की यामुळे त्याचा गोंधळ उडाला. परंतु आता पाणी डोक्याच्या वर गेले आहे. प्रत्येकाची परिस्थिती खराब आहे. या परिस्थितीत कुणीही चुकीचे पाऊल उचलू नये, एवढेच मी सांगू इच्छिते. 

  • गेल्या वर्षी जून महिन्यात सुरु झाला होता शो

गेल्या वर्षी जून महिन्यात 'हमारी बहू सिल्क' हा शो सुरु झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये याचे प्रक्षेपण थांबवण्यात आले. एका कार्यक्रमात अभिनेता जान खानने सांगितले होते की, या शोचे कलाकार आणि तंत्रज्ञांचे एक वर्षापासून पेमेंट देण्यात आलेले नाही.

  • कृती सेननने शेयर केला होता टेक्निशिअनचा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने एका वृद्ध टेक्निशियनचा व्हिडीओ शेअर केला होता आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (सिंटा) ला या लोकांचे पैसै मिळवून द्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर सिंटा आणि कलाकारांच्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईज या संघटनेनं संबंधित निर्मात्यांसोबच चर्चाही केली होती.

बातम्या आणखी आहेत...