आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हमारी बहू सिल्क:टीमला पैसे न दिल्याच्या आरोपावर निर्मात्याचे स्पष्टीकरण - हे अत्यंत लज्जास्पद आहे की सर्व दोष मला देण्यात आला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
'हमारी बहू सिल्क' या मालिकेचे निर्माते ज्योती गुप्ता आणि लीड कलाकार जान खान- चाहत पांडे. - Divya Marathi
'हमारी बहू सिल्क' या मालिकेचे निर्माते ज्योती गुप्ता आणि लीड कलाकार जान खान- चाहत पांडे.
  • व्हिडीओत एका टेक्निशिअनने त्याला 7 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याचे सांगितले आहे.

मुंबई. 'हमारी बहू सिल्क' या मालिकेचे निर्माते ज्योती गुप्ता यांनी कास्ट आणि क्रू मेंबर्सला पैसे न दिल्याच्या आरोपांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. अलीकडेच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता जान खानने दावा केला होता की, शोची अभिनेत्री चाहत पांडेला वर्षभरापासून मानधन न मिळाल्याने तिची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आणि त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न  केला होता. तर दुसरीकडे व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत एका टेक्निशिअनने त्याला 7 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याचे सांगितले आहे.

  • हे आहे निर्माता ज्योती गुप्तांचे स्पष्टीकरण

एका बातचीतमध्ये ज्योती म्हणाले, "हे अत्यंत लज्जास्पद आहे की सर्व दोष मला देण्यात आला. अराजक परिस्थिती असतानाही मी मर्यादित स्त्रोतांनी हा कार्यक्रम चालवण्याचा प्रयत्न केला."

गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मालिकेच्या प्रॉडक्शनसाठी त्यांना कामावर घेण्यात आले होते तेव्हा संपूर्ण नियंत्रण इतरांकडे होते. ते म्हणतात, "क्ले (प्रॉडक्शन हाऊस) ने मला हा कार्यक्रम पूर्णपणे सोपविला नव्हता. प्रसारमाध्यमांमध्ये मात्र तसा दावा केला जात आहे. बर्‍याच काळापर्यंत क्ले प्रॉडक्शन शोचा निर्माता राहिले. माझी भूमिका कामाला मॅनेज करण्यापुरतीच मर्यादित होती."

ज्योती गुप्तांनी त्यांना होणा-या त्रासासाठी क्ले प्रॉडक्शन कंपनीला दोषी ठरवले आहे.  त्यांच्या मते शो नोव्हेंबर 2019 ला बंद केला होता आणि त्याचे कारण म्हणजे झी टीव्हीला क्लेच्या कामाबाबत, त्यांच्या क्रीएटीव्हीटीबाबत आक्षेप होता, ते समाधानाी नव्हते.

ज्योती यांनी पुढे सांगितल्यानुसार, 'ऑक्टोबरनंतर वाहिनीने क्ले प्रॉडक्शनला पैसै देणे पुुर्ण बंद केले होते, त्यामुळे माझ्याकडूनही पैसै देणे बंद झाले,  याचे कारण म्हणजे क्ले प्रॉडक्शनने झीसोबतचा करार तोडला होता, जो वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊस मध्ये झाला होता. त्यांनी झीला आमच्यात झालेल्या कराराबाबत काहीही सांगितले नव्हते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शो  ऑफ एअर झाला आणि त्यानंतर क्लेसुद्धा गायब झाले.'

  • गेल्या वर्षी जून महिन्यात सुरु झाला होता शो

गेल्या वर्षी जून महिन्यात 'हमारी बहू सिल्क' हा शो सुरु झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये याचे प्रक्षेपण थांबवण्यात आले. एका कार्यक्रमात अभिनेता जान खानने सांगितले की, या शोचे कलाकार आणि तंत्रज्ञांचे एक वर्ष पेमेंट देण्यात आले नव्हते,  यामुळे शोची मुख्य अभिनेत्री चाहत पांडेने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, तीची आई वेळीच पोहोचली नसती तर चाहत आज या जगात नसती. 

  • कृती सेननने शेयर केला होता टेक्निशिअनचा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री  कृती सेननने एका वृद्ध टेक्निशियनचा व्हिडीओ शेअर केला होता आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (सिंटा) ला या लोकांचे पैसै मिळवून द्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर सिंटा आणि कलाकारांच्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईज या संघटनेनं संबंधित निर्मात्यांसोबच चर्चाही केली होती.

बातम्या आणखी आहेत...