आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनिक क्षण:‘हमारीवाली गुड न्यूज’च्या निमित्ताने जूही परमारच्या चिमुकलीने तिला दिले एक मोठे सरप्राईज!, इमोशनल जूही म्हणाली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जूहीने समायराच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी टीव्ही वाहिनीवर नुकतीच ‘हमारीवाली गुड न्यूज’ ही नवी मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत भारतीय समाजात सासू-सुनेच्या नात्याचे समीकरणच बदलून टाकणार्‍्या एका हृदयस्पर्शी कथेच्या समावेश आहे. भारतीय टीव्हीवर सासू-सुनेचे नाते हे नेहमी शत्रुत्त्वाचे, परस्परांविरुध्द कट कारस्थाने रचण्याचे दाखविले गेले आहे. पण या मालिकेत हे नाते परस्परविश्वास, आशा आणि मैत्रीवर आधारित असल्याचे दाखविण्यात आले आहे.

‘हमारीवाली गुड न्यूज’ या मालिकेत सासू-सुना एकमेकींच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतात. किंबहुना या मालिकेत गुड न्यूज देण्यासाठी सासू रेणुका आणि सून नाव्या यांनी आपापल्या नात्याच्या भूमिकांची चक्क अदलाबदल केल्याचे दाखविले आहे.

या नव्या आणि रंजक मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री जूही परमार ही सासू रेणुकाची भूमिका साकारत आहे. तिचे चाहते तिला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक असून तिची चिमुकली मुलगी समायरा ही देखील अतिशय एक्साइटेड आहे. म्हणूनच ‘हमारीवाली गुड न्यूज’च्या प्रसारणाच्या पूर्वसंध्येला जूहीची मुलगी समायराने तिला एक अनोखी भेट देऊन आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

या मालिकेच्या शीर्षकगीतावर छोट्या सॅमीने नृत्य केले आणि सर्वांनी 20 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 7.30 वाजता ही मालिका पाहावी, असे आवाहन केले. जूहीने समायराच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो पाहिल्यावर तो खरोखरच फार छान आहे, हे दिसून येते.

याविषयी जूही म्हणाली, “समायराने मला आश्चर्याचा धक्का दिला आहे, आणि ती माझ्यावर अनोख्या पध्दतीने प्रेम करते. तिचं नृत्य हे मी पुन्हा छोट्या पडद्यावर दिसण्याचं सर्वात मोठं हृदयस्पर्शी स्वागत म्हणावं लागेल. हमारीवाली गुड न्यूजच्या शीर्षकगीतावर माझ्या मुलीने नृत्य केलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”

बातम्या आणखी आहेत...