आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागिन 4 च्या अभिनेत्रीचे नुकसान:अभिनेत्री निया शर्माच्या कारमधून चोरीला गेली हँडबॅग, सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली मुंबई पोलिसांकडे मदत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या लोअर परळमधील एका सिग्नलवर ही घटना घडली.

आपल्या वादग्रस्त बर्थडे केकमुळे सध्या चर्चेत असलेली छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा हिचे अलीकडेच एक मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी प्रवासादरम्यान नियाची हँडबॅग तिच्या गाडीतून चोरीला गेली आहे. ही घटना घडताच नियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे आणि तिला लगेचच मदतीचे आश्वासनदेखील मिळाले.

मुंबईच्या लोअर परळमधील एका सिग्नलवर ही घटना घडली. यासंदर्भात नियाने ट्विट करत मुंबई पोलिसांची मदत महितली आहे. ‘लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील सिग्नलवरून, माझ्या गाडीतून हँडबॅग चोरीला गेली आहे. मुंबई पोलिस मला मदत करा’, अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. सोबतच तिने आपल्या काळ्या रंगाच्या हँडबॅगचे छायाचित्रदेखील शेअर केले.

विशेष म्हणजे नियाने ट्विट करत पोलिसांची मदत मागितल्यावर मुंबई पोलिसांनी देखील लगेच उत्तरादाखल ट्विट केले आहे. तिच्या ट्विटवर मुंबई पोलिसांनी उत्तर देत म्हटले की, ‘आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. लवकरच तुम्हाला मदत केली जाईल’, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या या सतर्कतेचे नियाने कौतुक केले आणि लिहिले, 'लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद'.

निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती कायम स्वतःची बोल्ड छायाचित्रे शेअर करत असते. अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अभिनेता रवी दुबे आणि सरगून मेहता यांच्या घरातील एका पार्टी दरम्यानचा आहे. यात निया त्यांच्या मोलकरणीसह धमाल डान्स करताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा, इश्क में मरजावां आणि नागिन 4 या शोजमध्ये नियाने काम केले आहे. याशिवाय तिने खतरों के खिलाजी - मेड इन इंडिया या शोचा खिताबदेखील आपल्या नावी केला होता.

बातम्या आणखी आहेत...