आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉसचे हाइएस्ट पेड कंटेस्टंट:पामेला अँडरसनला घरात तीन दिवस घालवण्यासाठी दिले गेले अडीच कोटी, जसलीनसोबत प्रेमाचे नाटक करणार्‍या अनूप जलोटांना दर आठवड्याला मिळायचे 40 लाख रुपये

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या शोमध्ये भाग घेण्यासाठी राधे माँला दर आठवड्याला 25 लाख रुपये दिले जाणार आहेत.

टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसचा 14 वा सीझन 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या पर्वातदेखील अनेक लोकप्रिय सेलेब्स शोमध्ये एन्ट्री घेतील, जे तीन महिने घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. यावेळी स्पर्धकांमध्ये स्वयंघोषित देवी राधे माँ सहभागी होणार आहे.

या शोमध्ये भाग घेण्यासाठी राधे माँला दर आठवड्याला 25 लाख रुपये दिले जाणार असल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले गेले आहे. ती या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक असल्याचे समजते.

बिग बॉस मागील पर्वांमध्येही अनेक नावाजलेल्या लोकांना या शोमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम मोजली आहे. एक नजर टाकुयात सर्वाधिक मानधन घेतलेल्या बिग बॉसच्या काही स्पर्धकांवर...

1) पामेला अँडरसन
पर्व : बिग बॉस 4

सीझन 4 मध्ये पामेलाने घरात फक्त 3 दिवस घालवले. पण त्यासाठी तिला अडीच कोटी रुपये देण्यात आले होते.

2) ग्रेट खली
पर्व: बिग बॉस 4

खली या पर्वातील फर्स्ट रनर अप ठरला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याला दर आठवड्याला 50 लाख रुपये देण्यात आले.

3) रिमी सेन

पर्व: बिग बॉस 9

रिमीला या शोमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी तब्बल 2 कोटींची रक्कम देण्यात आली होती.

4) एस. श्रीशांत
पर्व : बिग बॉस 12

माजी क्रिकेटपटू श्रीशांतला बिग बॉसचा भाग व्हायचे नव्हते, पण जेव्हा त्याला दर आठवड्याला 50 लाख रुपयांची ऑफर दिली गेली तेव्हा तो ती नाकारू शकला नाही.

5) रश्मी देसाई

पर्व : बिग बॉस 13

टेलिव्हिजन स्टार रश्मी देसाई हिला या कार्यक्रमासाठी दर आठवड्याला 15 लाख रुपये फी दिली गेली.

6) सिद्धार्थ शुक्ला

पर्व: बिग बॉस 13

या पर्वाचा विजेता ठरलेल्या सिद्धार्थला 40 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले, याव्यतिरिक्त त्याला दर आठवड्यातून नऊ लाख रुपये फी दिली गेली.

7) अनूप जलोटा

पर्व: बिग बॉस 12

गायक अनूप जलोटा आपली तथाकथित गर्लफ्रेंड जसलीन मथारूसोबत प्रेमाचे नाटक करायला शोमध्ये आले होते. त्यांना दर आठवड्याला 40 लाख रुपये मानधन म्हणून दिले गेले.

8) दीपिका कक्कड

पर्व: बिग बॉस 12

शोची विजेती ठरलेल्या दीपिकाला 30 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले, तर तिची प्रत्येक आठवड्याची फी 15 लाख रुपये होती.

9) करणवीर बोहरा
पर्व : बिग बॉस 12

या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी करणला दर आठवड्याला 15 लाख रुपये देण्यात आले.

10) तनिषा मुखर्जी

पर्व : बिग बॉस 7

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेल्या तनिषाला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी दर आठवड्याला साडेसात लाख रुपये दिले गेले.

11) श्वेता तिवारी

पर्व : बिग बॉस 4

या पर्वाची विजेती ठरलेल्या श्वेताला दर आठवड्याला पाच लाख रुपये मिळाले, तर तिला बक्षीस म्हणून एक कोटी रुपयेही देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...